शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

भारतातील सर्वात मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन येतोय; Tecno Pova 3 चे फीचर्स झाले लीक  

By सिद्धेश जाधव | Published: May 07, 2022 12:47 PM

Tecno Pova 3 चे स्पेसिफिकेशन लाँच होण्याआधीच लीक झाले आहेत. यात 7000mAh बॅटरीसह भन्नाट फीचर्स मिळणार आहेत.  

Tecno नं काही दिवसांपूर्वी भारतात Tecno Pova 2 स्मार्टफोन सादर केला होता. यातील 7000mAh ची बॅटरी लक्षवेधी फिचर होतं. हा भारतातील सर्वात मोठी बॅटरी असलेल्या स्मार्टफोन्स पैकी एक होता. आता पुन्हा एकदा कंपनी एवढीच मोठी बॅटरी असलेला हँडसेट सादर करणार आहे. Tecno Pova 3 ची जोरदार तयारी सुरु आहे.  

Tecno Pova 3 मधील संभाव्य स्पेसिफिकेशन 

टिपस्टर Paras Guglani नं आगामी टेक्नो फोन Bureau of India Standards (BIS) च्या डेटाबेसमध्ये LF7 मॉडेल नंबरसह स्पॉट केला होता. त्यानुसार, हा डिवाइस Tecno Pova 3 च्या नावाने बाजारात येईल. ज्यात 1080×2460 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.9 इंचाचा Full HD+ डिस्प्ले मिळेल. 20.5:9 आस्पेक्ट रेशियोसह यात 90Hz रिफ्रेश रेट मिळेल. Helio G88 चिपसेटच्या प्रोसेसिंग पावरसह 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.  

फोटोग्राफीसाठी Tecno Pova 3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 50MP चा मेन सेन्सर असेल. फ्रंटला ड्युअल LED फ्लॅशसह 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. हँडसेटमध्ये 7000mAh ची बॅटरी देऊ शकते. जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन Ecological Black, Silver Sea आणि Blue Sea अशा तीन कलर व्हेरिएंटसह बाजारात येऊ शकतो.  

Tecno Pova 2 स्पेसिफिकेशन्स  

Tecno Pova 2 मध्ये 6.9-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर झाला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. हा टेक्नो स्मार्टफोन Android 11 वर आधारित HiOS 7.6 वर चालतो.  

Tecno Pova 2 मध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा AI फोटोग्राफी सेन्सर देण्यात आला आहे. हा फ्रंटला 8 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. टेक्नो पोवा 2 मध्ये 7,000mAh ची दमदार बॅटरी 18W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडMobileमोबाइल