Tecno कंपनी आपले स्वस्त स्मार्टफोन सादर करण्यासाठी ओळखली जाते. कंपनीच्या फोन्समध्ये मोठी बॅटरी दिली जाते. कंपनी अजूनही 5G Phones च्या ट्रेंडपासून दूर आहे, परंतु आता हे बदलणार आहे. आता एका लीकमधून Tecno Pova 5G स्मार्टफोनची बातमी आली आहे, जो कंपनीचा पहिला 5G स्मार्टफोन असेल.
Tech Arena24 ने आपल्या यूट्यूब चॅनेलवरून Tecno Pova 5G स्मार्टफोनची माहिती शेयर केली आहे. या व्हिडीओनुसार हा कंपनीचा पहिला 5जी फोन असेल. तसेच या लीकमध्ये या फोनच्या किंमत, डिजाईन आणि महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. रेंडर्सनुसार हा फोन ब्लॅक कलरसह बाजारात येईल.
Tecno Pova 5G Phone
लीकनुसार Tecno Pova 5G फोनची किंमत 280-300 डॉलर दरम्यान ठेवण्यात येईल. म्हणजे 20 ते 23 हजार भारतीय रुपयांच्या बजेटमध्ये हा फोन सादर केला जाईल. हा फोन पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये ग्राहकांच्या भेटीला येईल. सर्वप्रथम अफ्रीकन मार्केटमध्ये हा 5G फोन पदार्पण करू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार Tecno Pova 5G फोनमध्ये 6.9-इंचाचा फुल एचडी+ IPS LCD डिस्प्ले मिळेल. फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 900 प्रोसेसरसह बाजारात येईल. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळेल. डिवाइसच्या बॅक पॅनलवर असलेल्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा मिळेल. अन्य रियर कॅमेरा सेन्सर आणि सेल्फी कॅमेऱ्याची माहिती मात्र टिपस्टरने दिली नाही. हा फोन 6000mAh बॅटरीसह बाजारात येईल, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.