Tecno भारतात लवकरच आपला सर्वात पहिला 5G Smartphone लाँच करणार आहे. कंपनी गेल्यावर्षी नायजेरियात सादर केलेला Tecno Pova 5G देशात सादर करणार आहे. या लाँचची माहिती स्वतः कंपनीनं दिली आहे. त्यानुसार Tecno Pova 5G स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतात लाँच केला जाईल. लाँच झाल्यानंतर या फोनची विक्री Amazon इंडियाच्या माध्यमातून केली जाईल. याआधी जागतिक बाजारात आल्यामुळे या स्मार्टफोनच्या स्पेक्स आणि किंमतीचा अंदाज आला आहे.
Tecno POVA 5G चे स्पेसिफिकेशन्स
Tecno POVA 5G मध्ये 6.95 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. वर लाँच केला गेला आहे. पंच-होल डिजाईनसह येणारा हा फोन 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित हायओएसवर चालतो. या फोनला मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. सोबत 8GB वेगवान LPDDR5 RAM आणि 128GB लेस्टस्ट UFS 3.1 storage देण्यात आली आहे. या फोनमधील 3 जीबी व्हर्च्युअल रॅममुळे एकूण रॅम 11 जीबी करता येतो.
फोटोग्राफीसाठी Tecno POVA 5G च्या मागे ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि एक एआय लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिगसाठी यात 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये बेसिक कनेक्टिविटीसह साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी या टेक्नो फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते. Tecno Pova 5G भारतात 18 ते 20 हजार रुपयांच्या आत सादर केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
रंग बदलणारे दोन भन्नाट Realme स्मार्टफोन्स भारतात करणार एंट्री; लाँचचा मुहूर्त ठरला
हल्ली नव्या स्मार्टफोन्स सोबत ‘चपट्या पिन’चा Micro USB चार्जर का देत नाहीत? जाणून घ्या उत्तर