Tecno भारतात 20 जानेवारीला Tecno Pova Neo स्मार्टफोन लाँच करणार आहे, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. परंतु अधिकृत लाँच पूर्वीच हा स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध देखील झाला आहे. या स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला मॉडेल रिटेलर महेश टेलीकॉमवरून 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. महेश टेलीकॉमनं आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून याची माहिती दिली आहे. त्यामुळे लाँचपूर्वीच या स्मार्टफोनची किंमत समजली आहे.
Tecno Pova Neo चे स्पेक्स
टेक्नो पोवा नियोमध्ये 6.8 इंचाचा लार्ज एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या नवीन टेक्नो फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅश, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Tecno Pova Neo स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित हायओएस 7.6 वर चालतो. हा बेसिक कनेक्टिव्हिटीसह येणार ड्युअल सिम फोन आहे. ज्यात सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
पॉवर बॅकअपसाठी नवीन टेक्नो पोवा नियो फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, ही या फोनची खासियत आहे. हा डिवाइस 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच नॉर्मल युज केल्यास एकापेक्षा जास्त दिवस हा फोन वापरता येईल, असा दावा टेक्नो मोबाईल कंपनीनं केला आहे.
हे देखील वाचा:
सेलची कृपा! बजेट 10 हजार तरीही ढासू स्मार्टफोन हवाय? मग एकदा हे स्मार्टफोन बघाच