नवी दिल्ली - टेक्नो या जागतिक प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने आज 'ऑल-राऊंडर' स्पार्क ७ सिरीजमध्ये अधिक वाढ करत नवीन स्पार्क ७ प्रो स्मार्टफोनच्या लाँचची घोषणा केली. ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करत स्पार्क ७ प्रो भारतातील तंत्रज्ञानप्रेमी मिलेनियल्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे. टेक्नो स्पार्क ७ प्रो मध्ये ४८ मेगापिक्सल एआय ट्रिपल रिअर कॅमेरासह क्वॉड फ्लॅश आणि २के रेकॉर्डिंग आहे. १८० हर्टझ टच सॅम्प्लींग रेट व ९० हर्टझ रिफ्रेश रेटसह हेलिओ जी८० प्रोसेसर आहे. ६६ इंच एचडी+ डॉट इन डिस्प्लेसह ५,००० एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन स्पार्क ७ प्रो ग्राहकांना दीर्घकाळापर्यंत सर्वोत्तम अनुभव देईल.
ट्रान्झिशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिजीत तालापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''स्थापनेपासूनच टेक्नोच्या ऑफरिंग्ज व उपक्रमांनी ग्राहकांसाठी वास्तविक मूल्यनिर्मिती करण्याची आपली कटिबद्धता कायम राखली आहे. टेक्नोने भारतामध्ये संपादित केलेल्या १ कोटीहून अधिक ग्राहकवर्गाच्या यशामधून ही कटिबद्धता दिसून येते. ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करत नवीन स्पार्क ७ प्रो स्मार्टफोन आधुनिक मल्टी-टास्किंग युजर्स व प्रो-लेव्हल गेमर्सची किफायतशीर दरामध्ये डिस्प्ले, उच्च दर्जाचा कॅमेरा व प्रोसेसर असलेला स्मार्टफोन असण्याची गरज लक्षात घेत डिझाइन करण्यात आला आहे.''
मॉडेल स्पेशल लाँच किंमत १० टक्के एसबीआय बँक ऑफरनंतर लागू किंमत स्पार्क ७ प्रो (४+६४ जीबी) ९,९९९ रूपये ८,९९९ रूपये स्पार्क ७ प्रो (६+६४ जीबी) १०,९९९ रूपये ९,९०० रूपये स्पार्क ७ प्रो ची ठळक वैशिष्ट्ये
४८ मेगापिक्सल एआय ट्रिपल रिअर कॅमेरासह सुपर नाइट शॉट
पहिल्यांदाच स्पार्क पोर्टफोलिओमधील स्पार्क ७ प्रो मध्ये ४८ मेगापिक्सल एचडी रिअर कॅमेरा, एआय कॅमेरा आणि २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेराची भर करण्यात आली आहे, जो युजर्सना दिवसा व रात्री सुस्पष्ट आणि आकर्षक फोटोज व व्हिडिओज कॅप्चर करण्याची सुविधा देतो. २४० एफपीएस स्लो-मोशन शूटिंग युजर्सना परिपूर्ण अॅक्शन शॉटदरम्यान सुलभपणे हालचाली कॅप्चर करण्यामध्ये मदत करते.
रेकॉर्डिंग संदर्भात टेक्नो स्पार्क ७ प्रो च्या ट्रिपल रिअर कॅमे-यामध्ये व्हिडिओ बोकेह, एआय व्हिडिओ ब्युटी, २के क्यूएचडी रेकॉर्डिंग, शॉर्ट व्हिडिओ आणि इतर अनेक व्हिडिओ मोड्स आहेत, जे शक्तिशाली, व्यावसायिक ग्रेड व्हिडिओज कॅप्चर करण्यामध्ये मदत करतात. क्वॉड फ्लॅशसह पूरक असलेला टाइम लॅप्स मोड, स्माइल शॉट, सुपर नाइट मोड, नाइट पोर्ट्रेट, आय ऑटो-फोकस स्मार्टफोन फोटोग्राफी अनुभवामध्ये अधिक भर करतात.
६.६ इंची डॉट-इन डिस्प्लेसह उत्तम टच रिस्पॉन्ससाठी १८० हर्टझ टच सॅम्प्लींग रेट
टेक्नो स्पार्क ७ प्रो मध्ये ६.६ इंची एचडी + डॉट इन आयपीएस डिस्प्लेसह ७२० x १९०० एचडी+ रिझॉल्युशन आहे. ८९ टक्के स्क्रिन टू बॉडी रेशिओ, २०:९ अॅस्पेक्ट रेशिओ आणि ४५० नीट्स ब्राइटनेस वैविध्यपूर्ण व्युइंग अनुभव देतात. तसेच या स्मार्टफोनमध्ये गेमिंगदरम्यान उत्तम टच इनपुट्ससाठी १८० हर्टझ टच सॅम्प्लींग रेट आणि डिस्प्ले, अत्यंत सुलभ ब्राऊजिंग व व्हिडिओ अनुभवासाठी ९० हर्टझ रिफ्रेश रेट आहे.
टेक्नो स्पार्क ७ प्रो मध्ये स्ट्रीमलाइन डिझाइन आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन हातामध्ये सहजपणे मावतो. अल्ट्रा हाय प्रीसिशनसह लेझर मोल्ड एन्ग्रेव्हिंग, फ्लोइंग ऑप्टिकल मेटल टेक्स्चर, व्हर्टिकल स्प्लिट डिझाइन आणि थ्री-डायमेन्शन एस्थेटिक्स स्मार्टफोनच्या प्रिमिअम लुक व फीलमध्ये अधिक भर करतात.
उच्च-कार्यक्षम हेलिओ जी८० गेमिंग प्रोसेसर
टेक्नो स्पार्क ७ प्रो मध्ये मीडियाटेक हेलिओ जी८० प्रोसेसर आहे, ज्यामधून उच्च दर्जाच्या गेमिंग अनुभवासाठी बॅटरी दीर्घकाळापर्यंत टिकून राहण्याची खात्री मिळते. डायनॅमिक, हायपर इंजिन आणि रिसोर्स मॅनेजमेंट तंत्रज्ञान जलद प्रतिसाद व जलद फ्रेम रेट्स देतात. यामुळे कनेक्टीव्हीटीमध्ये सातत्यता राहते, ज्यामुळे अडथळा येण्यामध्ये घट होत विना-व्यत्यय स्मार्टफोन वापराचा आनंद घेता येतो.
८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह ड्युअल फ्रंट फ्लॅश
या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरासह एफ/२.० अर्पेचर आणि ड्युअल अॅडजस्टेबल फ्लॅशलाइट आहे, ज्यामुळे अंधुक प्रकाशात देखील सुस्पष्ट सेल्फी फोटो येतात. स्मार्टफोनवरील एआय पोर्ट्रेट मोड ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमे-याला सुस्पष्ट, प्रोफेशनल ग्रेड फोटो कॅप्चर करणा-या कॅमे-यामध्ये बदलते. स्पार्क ७ प्रो हा ऑटोफोकस, स्माइल शॉट व टाइम लॅप्स अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये देणारा स्पार्क सिरीजमधील पहिलाच स्मार्टफोन आहे, ज्यामुळे युजर्सना परिपूर्ण फोटो कॅप्चर करता येतात. तसेच या स्मार्टफोनमध्ये टाइम-लॅप्स, स्माइल-शॉट, सुपर नाइट शॉट, व्हिडिओ बोकेह आणि २के रेकॉर्डिंग सारखे इतर प्रोफेशनल मोड्स देखील आहेत.
व्यापक स्टोरेज क्षमता व कलर व्हेरिएण्टस
स्पार्क ७ प्रो दोन स्टोरेज व्हेरिएण्ट्स – ४ जीबी + ६४ जीबी व्हेरिएण्ट ९,९९९ रूपये आणि ६ जीबी + ६४ जीबी व्हेरिएण्ट १०,९९९ रूपये या स्पेशल लाँच ऑफर किंमतीमध्ये उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन अल्प्स ब्ल्यू, स्प्रूस ग्रीन व मॅग्नेट ब्लॅक या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल.
दीर्घकाळापर्यंत टिकणारी ५,००० एमएएच क्षमतेची बॅटरी
स्पार्क ७ प्रो मध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी जवळपास ३४ दिवसांचा स्टॅण्डबाय टाइम, ३५ तासांचा कॉलिंग टाइम, १४ तासांचे वेब ब्राऊजिंग, ७ दिवस म्युझिक प्लेबॅक, १५ तासांचे गेम प्लेइंग आणि २३ तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देते. मोठ्या क्षमतेची बॅटरी एआय पॉवर सेव्हिंग, फुल चार्ज अलर्ट सारख्या इतर एआय वैशिष्ट्यांसह येते आणि ओव्हरचार्जिंग टाळण्यासाठी फोन पूर्ण चार्ज होताच आपोआपपणे वीजपुरवठा बंद करते.
फेस अनलॉक व फिंगरप्रिंट सिक्युरिटी
स्पार्क ७ प्रो मध्ये इन-बिल्ट फेस अनलॉक २.० आणि स्मार्ट फिंगरप्रिंट सेन्सर आहे, जे युजरचा डेटा व गोपनीयतेचे संरक्षण करते. फेस अनलॉक २.० फोन दुस-याकडून सुरू करण्यापासून संरक्षण करते आणि सूर्यप्रकाशामध्ये डिस्प्ले सुस्पष्टपणे दिसण्याची खात्री देते. स्मार्ट फिंगरप्रिंट सेन्सर फोनला फक्त ०.१२ सेकंदांमध्ये अनलॉक करते.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....