Phone Under 10000: स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नोने काही दिवसांपूर्वी Tecno Spark 8 भारतात सादर केला होता. तेव्हा या फोनचा 2GB RAM आणि 32GB स्टोरेज असलेला एकच व्हेरिएंट बाजारात उपलब्ध झाला होता. आता कंपनीने फोनचा 3GB RAM आणि 32GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट देशात आणला आहे. या नव्या व्हेरिएंटची किंमत 9,299 रुपये ठेवण्यात आली आहे. 2GB रॅम व्हेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Tecno Spark 8 चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 8 एक अँड्रॉइड गो स्मार्टफोन आहे, जो अँड्रॉइड 11 गो व्हर्जनवर चालतो. ही गुगलची एक हलकी ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्यामुळे या फोनमध्ये कमी रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीने 2GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच हा टेक्नो स्मार्टफोन मीडियाटेकच्या हीलियो ए25 चिपसेटवर चालतो.
टेक्नो स्पार्क 8 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन, 480nits ब्राईटनेस आणि 269ppi पिक्सल डेन्सिटीला सपोर्ट करतो. या फोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 16MP चा मुख्य सेन्सर आणि एक क्यूवीजीए लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 8 MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क 8 स्मार्टफोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.