TECNO नं आपला नवीन स्मार्टफोन आज भारतात सादर केला आहे. हा फोन कंपनीच्या स्पार्क सीरिजमध्ये ‘स्पार्क’ सीरीजमध्ये Tecno Spark 8 Pro नावानं दाखल झाला आहे. 7GB RAM, 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह हा फोन विकत घेता येईल. कंपनीनं टेक्नो स्पार्क 8 प्रो ची किंमत 10,599 रुपये ठेवली आहे.
Tecno Spark 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंगसाठी यात MediaTek Helio G85 SoC मिळते, तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G52 GPU देण्यात आला आहे. हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा फोन Android 11 वर चालतो. ज्यात सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आला आहे.
Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, त्याचबरोबर अन्य दोन कॅमेरा सेन्सर देखील देण्यात आले आहेत. हा कॅमेरा सेटअप Super Night Mode 2.0ला सपोर्ट करतो. टेक्नोच्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फ्लॅश चार्जिंग देण्यात आली आहे. ही बॅटरी 63 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते, असा दावा कंपनीनं केला आहे.
Tecno Spark 8 Pro ची किंमत
टेक्नो स्पार्क 8 प्रो चा फक्त 4 जीबी रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट भारतात आला आहे. यात 3 जीबी वचुर्अल रॅममुळे एकूण रॅम 7 जीबी करता येतो. तर इंटरनल स्टोरेज देखील 512 जीबी पर्यंत वाढवता येते. अॅमेझॉनवर हा फोन 29 डिसेंबर पासून Winsor Violet, Turquoise Cyan, Interstellar Black आणि Komodo Island कलरमध्ये 10,599 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
Jio युजर्सनी इकडे लक्ष द्या! या 7 चुका तुम्हाला करू शकतात 'कंगाल', आताही वेळ आहे
फक्त 500 रुपयांमध्ये आला 15 तास चालणारा Bluetooth Neckband; जाणून घ्या वैशिष्ट्ये