Budget Phone: TECNO नं आपली बजेट फ्रेंडली ‘स्पार्क सीरीज’ भारतात घेऊन येत आहे. याची घोषणा कंपनीनं केली आहे. या सीरिज अंतर्गत Tecno Spark 8 Pro लवकरच देशात सादर केला जाईल. कंपनीनं ट्विटरवरून याची माहिती दिली. तसेच शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर देखील टेक्नो स्पार्क 8 प्रो चं प्रोडक्ट पेज लाईव्ह झालं आहे. त्यामुळे भारतात या फोनची विक्री अॅमेझॉनच्या माध्यमातून केली जाईल, हे स्पष्ट झालं आहे.
Tecno Spark 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंगसाठी यात MediaTek Helio G85 SoC मिळते, तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G52 GPU देण्यात आला आहे. हा फोन 6GB पर्यंतच्या रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा फोन Android 11 वर चालतो. ज्यात सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आला आहे.
Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, त्याचबरोबर अन्य दोन कॅमेरा सेन्सर देखील देण्यात आले आहेत. हा कॅमेरा सेटअप Super Night Mode 2.0ला सपोर्ट करतो. टेक्नोच्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फ्लॅश चार्जिंग देण्यात आली आहे.
Tecno Spark 8 Pro ची किंमत
Tecno Spark 8 Pro स्मार्टफोन सध्या बांग्लादेशात सादर करण्यात आला आहे. तिथे या फोनचा एकमेव 6GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. ज्याची किंमत 16,990 बांग्लादेशी टका ठेवण्यात आली आहे. ही किंमत सुमारे 14,700 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.
हे देखील वाचा:
खुशखबर! iPhone स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; Apple प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट
सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास