Tecno आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्समध्ये नेहमीच शानदार फीचर्स देण्याचं काम करते. आता कंपनीनं Tecno Spark 9 Pro स्मार्टफोनची जागतिक बाजारात घोषणा केली आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 50MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन गेल्यावर्षीच्या Tecno Spark 8 Pro ची जागा घेईल.
Tecno Spark 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 9 Pro मध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटस देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी85 चिपसेट सोबत माली जी52 जीपीयू मिळतो. सोबत 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. जी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. हा डिवाइस Android 12-आधारित HiOS 8.6 वर चालतो
Tecno Spark 9 Pro मध्ये 32-मेगापिक्सलचा सहनदार सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 50MP चा आहे, तर 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा एआय सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी Tecno Spark 9 Pro मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते, जी 18W फास्ट चार्जिंग स्पीडनं चार्ज करता येते.
Tecno Spark 9 Pro ची किंमत
Tecno Spark 9 Pro स्मार्टफोनच्या एकाच व्हेरिएंटची माहिती कंपनीनं दिली आहे, ज्यात 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. परंतु टेक्नो अजूनतरी या हँडसेटच्या किंमतीची घोषणा केली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा हँडसेट 15 हजार रुपयांच्या आत सादर केला जाऊ शकतो. Tecno Spark 9 Pro क्वॉन्टम ब्लॅक, बुरानो ब्लू, होली व्हाईट आणि हॅकर स्टॉर्म रंगात विकत घेत येईल.