Tecno आपल्या किफायतशीर स्मार्टफोनसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा कंपनीनं आपल्या Tecno Spark 9 सीरीजचा विस्तार करत Tecno Spark 9T स्मार्टफोन लाँच केला आहे. सध्या याची एंट्री नायजेरियामध्ये झाली आहे. तिथे हा फोन 13MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 8MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह आला आहे. लवकरच भारतात देखील स्मार्टफोनची एंट्री होऊ शकते.
Tecno Spark 9T चे स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 9T स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा Full HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो वॉटरड्रॉप नॉचसह 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी आणि 10W ची चार्जिंग देण्यात आली आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते.
Tecno Spark 9T स्मार्टफोनमध्ये MediaTek का Dimensity G37 SoC देण्यात आला आहे. सोबत 4GB रॅम आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. या फोनमध्ये microSD कार्ड स्लॉट देखील आहे. Tecno Spark 9T स्मार्टफोन Android 12 आधारित HiOS 8.6 वर चालतो. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सोबत फोनमध्ये AI लेन्स देखील आहे.
Tecno Spark 9T ची किंमत
नायजेरियात Tecno Spark 9T स्मार्टफोनच्या को 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 78,300 नाय्रा (सुमारे 14,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 4GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेल 88,000 नायरा (सुमारे 16,500 रुपये) मध्ये विकत घेता येईल. Tecno Spark 9T स्मार्टफोन टॉर्क्यूस स्यान, अटलांटिक ब्लू, आयरिश पर्पल आणि कोको गोल्ड कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.