Tecno ने 1 जुलै रोजी भारतात ‘स्पार्क’ सीरीजमध्ये नवीन टेक्नो फोन Tecno Spark Go 2021 लाँच केला होता. या लो बजेट स्मार्टफोनची किंमत 7,299 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु पहिल्या सेलमध्ये हा या स्मार्टफोनवर 500 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यामुळे हा टेक्नो स्मार्टफोन 6,699 रुपयांमध्ये आज दुपारी 12 वाजल्यापासून अॅमेझॉन इंडिया या ईकॉमर्स साईटवरून विकत घेता येईल. (Tecno Spark Go 2021 With Android 10 (Go Edition), MediaTek Helio A20 SoC Available in India for Sale)
Tecno Spark Go 2021 चे स्पेसिफिकेशन्स
टेक्नो स्पार्क गो 2021 मध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 10 (Go Edition) आधारित हाईओएस 6.2 सह सादर करण्यात आला आहे. हा टेक्नो स्मार्टफोन मीडियाटेकच्या Helio A20 चिपसेटवर चालतो. या फोन 2 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रो एसडीकार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी TECNO Spark Go 2021 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक एआय लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये फ्रंट फ्लॅश लाईटसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. टेक्नोचा हा ड्युअल सिम फोन पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 7 जुलैपासून अॅमेझॉनवर विकत घेता येईल.