TECNO नं आपली ओळख सार्थ करत दोन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात सादर केले आहेत. यातील Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनची किंमत 10,599 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Tecno Spark GO 2022 नावाचा स्मार्टफोन फक्त 7,499 रुपयांमध्ये अॅमेझॉनवरून विकत घेता येईल. चला जाणून घेऊया या एंट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये नक्की आहे तरी काय.
Tecno Spark GO 2022 चे स्पेसिफिकेशन्स
टेक्नो स्पार्क गो 2022 स्मार्टफोन 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले सह बाजारात आला आहे. हा डॉट नॉच डिजाईन असलेला एलसीडी पॅनल आहे, जो 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. यात 2GB RAM आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. नावावरून समजले असेल कि हा फोन अँड्रॉइड 11 गो एडिशनसह हायओएस 7.6 वर चालतो. अँड्रॉइड गो हे अँड्रॉइडचं हलकं व्हर्जन आहे, जे कमी रॅम आणि हलके प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनसाठी बनवण्यात आलं आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात ड्युअल एलईडी फ्लॅश, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक एआय लेन्स मिळते. Tecno Spark GO 2022 स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे या फोनच्या फ्रंटला देखील फ्लॅश लाईट मिळते. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह यात रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी मिळते.
हे देखील वाचा:
Jio युजर्सनी इकडे लक्ष द्या! या 7 चुका तुम्हाला करू शकतात 'कंगाल', आताही वेळ आहे
फक्त 500 रुपयांमध्ये आला 15 तास चालणारा Bluetooth Neckband; जाणून घ्या वैशिष्ट्ये