शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नंबर पोर्टेबलिटीवर टेलिकॉम कंपन्यांची मनमानी चालणार नाही; ट्रायनं SMS बाबत दिले ‘हे’ आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 17:21 IST

नंबर पोर्टेबिलिटी विनियम २००९ अंतर्गत ग्राहकांना संबंधित सुविधा देण्याचे आदेश TRAI ने सर्व कंपन्यांना दिले.

नंबर पोर्टेबिलिटीबाबत (MNP) टाळाटाळ करणाऱ्या दूरसंचार कंपन्यांविरोधात (Tlecom Companies) दूरसंचार नियामकाने कठोर भूमिका घेतली आहे. ट्रायने (TRAI) सर्व दूरसंचार कंपन्यांना पोर्टेबिलिटीबाबत लादलेल्या अटी तात्काळ हटवण्यास सांगितलं आहे. TRAI ने मोबाइल ऑपरेटरना पोर्टेबिलिटीसाठी तात्काळ आउटगोइंग एसएमएस सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान, मोबाइल नंबर पोर्टेबलिटीमध्ये अनेक अडचणी येत असल्यामुळे नंबर पोर्ट करता येत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांनी ट्रायकडे केल्या होत्या.दरम्यान, कंपन्या काही प्रीपेड व्हाउचर/प्लॅनमध्ये मोबाइल नंबर पार्टेबिलिटीशी संबंधित एसएमएस पाठवण्याची सुविधा देत नाहीत. ग्राहकांना पोर्टेबलिटीसाठी मोठे रिचार्ज करण्याच्या अटीही घालतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक आपला नंबर पोर्ट करू शकत नाहीत. कितीही रकमेचा रिचार्ज केला असला तरी सर्व ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ट्रायनं कंपन्यांच्या काही प्रीपेड व्हाउचरमध्ये आउटगोइंग एसएमएस सेवा न देण्याच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.आपल्याकडे रिचार्ज पॅक असतानाही मोबाइल क्रमांत पोर्ट करताना UPC जनरेट करण्यासाठी 1900 या क्रमांकावर एसएमएस पाठवता येत नसल्याच्या तक्रारी मिळाल्याचं ट्रायनं सांगितलं. दरम्यान, नंबर पोर्टेबलिटी विनियम २००९ अंतर्गत प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना पोर्टेबलिटीची सुविधा देण्यासाठी १९०० या क्रमांकावर एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळावी असे निर्देश नियामकानं दिलेत.

टॅग्स :MobileमोबाइलTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय