नवी दिल्ली - व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीचा अनेकांनी धसका घेतला आहे. सुरक्षित असलेल्या इतर पर्यायांचा युजर्स सध्या शोध घेत आहेत. याचाच मोठा फायदा टेलिग्रामला झालेला पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासांत टेलिग्रामने कमाल केली आहे. मेसेजिंग अॅपमध्ये गेल्या 72 तासांत अडीच कोटी नवीन युजर्स जोडले गेले गेल्याची माहिती दिली आहे. कंपनीने हे युजर्स जगभरातून जोडले आहेत. मात्र सर्वात जास्त 38 टक्के युजर्स हे आशियातील आहेत. तर 27 टक्के युजर्स हे युरोपमधील आहेत. 21 टक्के युजर्स हे लॅटिन अमेरिकातील तर 8 टक्के युजर्स हे MENA तून आले आहेत.
टेलिग्रामने एकूण 500 मिलियन अॅक्टिव्ह युजर्संचा आकडा सुद्धा पार केला आहे. व्हॉट्सअॅपने नवी पॉलिसी आणल्यानंतर सिग्नलप्रमाणे टेलिग्राम डाऊनलोड करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन पॉलिसीनंतर युजर्सच्या डेटावरून चिंता व्यक्त केली जात आहे. युजर्स अन्य मेसेजिंग अॅपवर जात आहेत. जे जास्त सुरक्षित आहेत. एलन मस्क यांनीही फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपला मायग्रेशन करण्याचे आवाहन केले आहे.
Sensor Tower च्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीत बदल केल्यानंतर भारतातील सिग्नल आणि टेलिग्रामची संख्या 40 लाखांपर्यंत वाढली आहे. सिग्नलने या स्पर्धेत बाजी मारली आहे. 6 जानेवारी ते 10 जानेवारी पर्यंत 2.3 मिलियन नवीन डाऊनलोड सोबत टॉप स्पॉट मिळवले आहे. तर टेलिग्रामने या दरम्यान 1.5 मिलियन नवीन डाऊनलोड मिळवले आहेत. नव्या युजर्संची संख्या पाहता टेलिग्रामचे पॉवेल डुरॉव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "लोक आपली प्रायव्हसी बदलत असल्याने फ्री सर्व्हिस घेत नाहीत. त्यांना प्रायव्हसी हवी आहे. त्यामुळे रोज 1.5 मिलियन युजर्स साइन अप करत आहेत."
"आम्ही आधीही सात वर्षांत युजर्सच्या प्रायव्हसीची सुरक्षा करताना डाऊनलोडची संख्या वाढवली होती. 500 मिलियन अॅक्टिव्ह युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे टेलिग्राम प्रायव्हसी आणि सिक्योरिटीसाठी कटिबद्ध असलेला सर्वात मोठा कम्यूनिकेशन प्लॅटफॉर्म टेलिग्राम बनले आहे" असं देखील पॉवेल डुरॉव यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत Google आणि WhatsApp ची जोरदार चर्चा सुरू झाली होती. काही पब्लिक ग्रुप हे गुगल सर्चच्या रिझल्टमध्ये दिसत असल्याची त्याची चर्चा रंगली होती. या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील चॅट आणि मेंबर इन्फो ही गुगल सर्चमध्ये पाहिली गेली होती. मात्र ही समस्या त्यानंतर दूर करण्यात आली होती. तसेच ग्रुप सुद्धा लपवण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा काही व्हॉट्सअॅप ग्रुप आणि प्रोफाईल गुगल सर्चमध्ये दिसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
खरंच की काय? Google Search मध्ये दिसतोय तुमचा नंबर अन् WhatsApp प्रोफाईल; खासगी ग्रुप झाले सार्वजनिक
Gadgets 360 सोबत चर्चा करताना सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजसहरिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. युजर्सचा फोन नंबर आणि प्रोफाईल पिक्चर सुद्धा यावेळी गुगल सर्चमध्ये दिसत आहे. म्हणजेच गेल्यावेळेपेक्षा ही स्थिती चिंताजनक आहे. जर कोणाकडे व्हॉट्सअॅप ग्रुपची यूआरएल असेल तर गुगलवर याला सर्च करून जॉइन करू शकतात. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, युजर्स लिंकसोबत ग्रुप जॉईन करू शकतात. तसेच ग्रुप मेंबर्सचा फोन नंबर पाहू शकतात. याशिवाय, ग्रुप मेंबरच्या पोस्ट सुद्धा गुगलवर सर्च करून पाहिल्या जाऊ शकतात. व्हॉट्सअॅपने कधीपासून ग्रुप चॅट इनव्हाइटला गुगलवर इंडेक्स करणे सुरू केले आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.