भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीवर गेल्या तीन-चार वर्षांपासून अब्जाधीश मुकेश अंबानींच्या Reliance Jio ने अक्षरश: राज्य केले आहे. आता या जिओला जगातील सर्वात मोठा अब्जाधीश नेस्तनाभूत करण्यासाठी येत आहे. या अब्जाधीशाचे नाव आहे एलन मस्क (Elon Musk). टेस्ला कारच्या एन्ट्रीनंतर मस्क यांची स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉरपोरेशन (SpaceX) स्टारलिंक प्रोजेक्ट भारतात आणणार आहे. यानंतर भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठा भूकंप होणार आहे. (According to the plans of SpaceX, Elon Musk is planning to enter the ever-growing Indian telecommunications industry with 100-Mbps satellite-based internet.)
SpaceX भारतात सुरुवातीच्या काळात 100 Mbps सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्व्हिस देणार आहे. या तयारीनिशी कंपनी भारतात उतरण्याची शक्यता आहे. 1 ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ असलेल्या भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये मस्क आपल्या कंपनीचा विस्तार करणार आहेत. Analyticsindiamag वेबसाइट नुसार भारत सरकारकडे मस्क यांच्या कंपनीने सॅटेलाईट बेस्ड ब्रॉडबँड टेक्नॉलॉजीची सेवा देण्यासाठी परवानगी मागितली आहे. ट्रायने गेल्या वर्षी एक प्रस्ताव पाठविला होता. याला स्पेस एक्सने उत्तर पाठविले आहे. यामध्ये SpaceX ची विंग सॅटेलाईट गव्हर्नमेंट अफेअर्सने हाय स्पीड सॅटेलाईट नेटवर्क भारतात सर्व लोकांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटीने जोडण्याच्या लक्ष्यामध्ये मदत करू शकते, असे म्हटले आहे. भारत इंटरनेट युजरचे मोठी बाजारपेठ आहे. येथे 70 कोटी इंटरनेट ग्राहक आहेत. यांची संख्या 2025 पर्यंत वाढून 97.4 कोटी होण्याची शक्यता आहे.
सध्या भारतात इंटरनेट स्पीड 12 Mbps आहे. 5जी आल्यानंतर भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. मात्र, गाव आणि दुर्गम भागात इंटरनेट पोहोचविण्यास वेळ लागणार आहे. हेच काम SpaceX च्या स्टारलिंक प्रोजेक्टने आरामात केले जाऊ शकते. कारण थेट सॅटेलाईटवरून या भागात इंटरनेट सेवा पुरविता येणार आहे. याचसोबत ही सेवा कमी किंमतीतही उपलब्ध होणार आहे. फायबर ऑप्टिक केबल टाकण्यास हजारो कोटी लागणार आहेत. त्यापेक्षा वायरलेस असलेल्या सॅटेलाईट सेवेद्वारे खर्चही कमी येणार आहे.
काय आहे स्टारलिंकStarlink एक पृथ्वीच्या खालच्या कक्षेत भ्रमण करणारी सॅटेलाईट सेवा आहे. याद्वारे ब्रॉडबँड सेवा पुरविली जातेय. टेस्लाच्या कार या संपूर्णपणे या सेवेवरच अवलंबून असतात. यामुळे स्टारलिंक भारतात आणावीच लागणार आहे. स्पेस एक्स ही मस्क यांची खासगी अंतराळ कंपनी आहे, जी भारताच्या इस्त्रो सारखेच अंतराळात सॅटेलाईट पाठविण्याचे काम करते. स्पेसएक्स 2027 पर्यंत अंतराळात 12000 सॅटेलाईट पाठविण्याची तयारी करत आहे. याचबरोबर जमिनीवरही या सॅटेलाईटचे स्टेशन तयार करणार आहे. SpaceX नुसार त्यांचा इंटरनेट स्पीड हा 50Mbps ते 150Mbps एवढा असणार आहे.