शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

Tesla Humanoid Robot: जाम भारी! इलॉन मस्कने लॉन्च केला पहिला ह्यूमनॉइड रोबोट, माणसांप्रमाणे सर्व कामे करणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 2:21 PM

Optimus Robot: चित्रपटांमध्ये रोबोट माणसांप्रमाणे कामे करताना दाखवतात, ती गोष्ट आता प्रत्यक्षात उतरली आहे.

Elon Musk : तुम्ही रजनीकांत यांचा 'रोबोट' किंवा हॉलिवूड अभिनेता विल स्मिथचा 'आय रोबोट' चित्रपट पाहिला असेल. त्या चित्रपटात रोबोट माणसांप्रमाणे सर्व कामे करताना दाखवण्यात आला आहे. आता ती संकल्पना प्रत्यक्षात उतरायला वेळ लागणार नाही. टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क (Tesla Elon Musk) यांनीही किमया करुन दाखवली आहे.

ह्युमनॉइड रोबोट लॉन्चइलॉन मस्क हे फक्त जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जात नाहीत, तर नवीन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीही त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेकदा प्रगत असे तंत्रज्ञान तयार केले आहे. त्यांची टेस्ला ऑटो पायलट कार, लोकांना मंगळावर नेण्याचा प्रकल्प, याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. यातच आता शुक्रवारी, मस्क यांनी एका एआय (Ai) इव्हेंटमध्ये ह्युमनॉइड रोबोट ऑप्टिमस (Humanoid Robot Optimus) लॉन्च केला आहे. 

रोबोट माणसांप्रमाणेच काम करतोया रोबोटच्या अनेक फीचर्सने जगाला चकित केले आहे. हा रोबोट उद्योग कार उद्योगापेक्षा अधिक यशस्वी होईल, असा मस्क यांना विश्वास आहे. इव्हेंटमध्ये या रोबोटचा प्रोटोटाइप स्टेजवर उतरवण्यासोबतच, त्याचा एक व्हिडिओही दाखवण्यात आला. या व्हिडिओमध्ये हा रोबोट बॉक्स उचलताना, झाडांना पाणी देताना आणि माणसांसारखी कामे करताना दिसत आहे. 

पुढील वर्षीपासून उत्पादन सुरू होऊ शकतेया कार्यक्रमात मस्क यांनी सांगितले की, शक्य तितक्या लवकर याला आणखी प्रगत ह्युमनॉइड रोबोट बनवण्याचा आमचा उद्देश आहे. रोबोटसाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा लवकरच येणार आहे. हा रोबोट अनपेक्षित परिस्थिती हाताळू शकतो की नाही, याची चाचणी लवकरच घेतली जाणार आहे, असेही ते म्हणाले. मस्क यांनी ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या AI इव्हेंटमध्येच टेस्लाच्या या रोबोटची घोषणा केली होती. सूत्रांनुसार, 2023 पासून त्याचे उत्पादन सुरू होऊ शकते.

हे काम देखील करू शकताइलॉन मस्क म्हणतात की, सुरुवातीला ऑप्टिमसचा वापर कंटाळवाण्या आणि धोकादायक कामांसाठी केला जाईल. तो टेस्लाच्या कारखान्यांमध्ये वस्तू इकडून-तिकडे फिरवताना दिसेल. तसेच, कार उत्पादनादरम्यान तो बोल्ट घट्ट करेल. ह्युमनॉइड रोबोट फर्म अॅजिलिटी रोबोटिक्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जोनाथन हर्स्ट यांनी रॉयटर्सला सांगितले की, हा रोबोट भविष्यात मानवाच्या अनेक गोष्टी करू शकतो. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTeslaटेस्लाRobotरोबोटtechnologyतंत्रज्ञान