नवी दिल्ली : जगात इंटरनेटवर असलेल्या इंग्रजी भाषेच्या मक्तेदारीला प्रादेशिक भाषांनी जबरदस्त सुरुंग लावला आहे. ९०च्या दशकात इंटरनेटवर इंग्रजी भाषेतील मजकुराचे प्रमाण ८० टक्के होते. ते आता घसरून ५३ टक्क्यांवर आले आहे. प्रादेशिक भाषांचा मजकूर मात्र २० टक्क्यांवरून वाढून ४७ टक्क्यांवर गेला आहे. ८३ टक्के भारतीय लोक विदेशी चित्रपट डबिंग अथवा सब-टायटलसह पाहणे पसंत करतात.
फोर्ब्सने या संदर्भात एक अहवाल जारी केला आहे. - ७ वर्षांत भाषांतरकारांची संख्या झाली दुप्पट - ७३.६ अब्ज डॉलरचा (६ लाख कोटी रुपये) होणार २०२५ पर्यंत भाषांतर उद्योग - ५१.६ अब्ज डॉलरचा (४.२७ लाख कोटी रुपये) उद्योग सध्या - ४,१३९ कोटी रुपयांचा भारतातील भाषांतराचा उद्योग