'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपटावरून देशात बराच वाद सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली आहे. मात्र, आता द काश्मीर फाइल्सच्या निर्मात्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे.
काश्मीर फाइल्स चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. युजर्सना अगदी सहजपणे हा चित्रपट डाउनलोड करता येत आहे. या चित्रपटाची फाईल टेलिग्राम (Telegram) या मेसेजिंग अॅपवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय अनेक वेबसाईटवरही हा चित्रपट अपलोड करण्यात आला आहे.
The Kashmir Files हा चित्रपट दोन साइजमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. एका फाईलची साईज जवळपास 512MB आहे. या साईजमध्ये 480P रेझ्योलूशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर याच्या दुसऱ्या फाईलची साईज 1.4GB एवढी आहे. याची क्वालिटी 480P पेक्षा चांगली आहे.
या दोन्ही फाईल्स हॉल प्रिंट आहेत. अर्थात याचे सिनेमागृहात चित्रिकरण झाल्याचे दिसते. टेलिग्रामच्या अनेक चॅनेल्सवर तो उपलब्ध आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. असे असताना चित्रपट ऑनलाईन लिक होणे मेकर्ससाठी धक्कादायक आहे. तज्ज्ञांच्या मते, चित्रपट निर्माते अशा वेबसाइट आणि टेलिग्राम चॅनेलवर कारवाई करून चित्रपट कायदेशीररित्या डिलीट करू शकतात.
यापूर्वीही चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याचे वृत्त आले होते. मात्र, तेव्हा तो वेबसाइट्सवरून तत्काळ हटवण्यातही आला होता. आता पुन्हा एकदा मेकर्स यावर अॅक्शन घेऊ शकतात.