Samsung फक्त स्मार्टफोन्स बनवत नाही तर स्मार्टफोन्सचे कंपोनंट देखील बनवते. कंपनी अन्य स्मार्टफोन निर्मात्यांना डिस्प्ले पॅनल आणि कॅमेरा सेन्सर देखील पुरवते. गेल्यावर्षी Samsung नं जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा सेन्सर सादर केला होता, ज्याचं रिजोल्यूशन 200MP होतं. तेव्हापासून ग्राहक या सेन्सरसह येणाऱ्या सॅमसंग फोनची वाट बघत आहेत. Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोन 200MP च्या पावरफुल कॅमेऱ्यासह लाँच केला जाईल.
2023 मध्ये होऊ शकतो लाँच
दक्षिण कोरियन पब्लिकेशन ETNews च्या रिपोर्टनुसार Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोनमध्ये 200MP चा नवीन सेन्सर देण्यात येईल. हा एक अपडेटेड 200MP कॅमेरा सेन्सर असेल. रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे की, 200 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्मार्टफोन 2023 मध्ये बाजारात उतरवला जाईल.
Samsung ISOCELL HP1 200MP कॅमेरा सेन्सर
Samsung ने 2021 मध्ये 200MP ISOCELL HP1 कॅमेरा सेन्सर 0.64μm पिक्सलसह सादर केला आहे. हा सेन्सर खूप डिटेल्स कॅप्चर करू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे तुम्ही काढलेला फोटो क्रॉप केल्यावर देखील तितकाच स्पष्ट दिसेल. यात सॅमसंगच्या पिक्सल बाइनिंग टेक्नॉलॉजी ‘ChameleonCell’ चा वापर करण्यात आला आहे. आगामी सॅमसंग फोनमध्ये ISOCELL HP1 चा अपडेट व्हर्जन ISOCELL HP3 वापरला जाईल. ज्यावर काम सुरु करण्यात आलं आहे.
या कंपन्या देखील आणू शकतात 200MP चा कॅमेरा असलेला फोन
गेल्यावर्षी डिसेंबरपासून बातमी येत आहे की Motorola Frontier स्मार्टफोन 200MP कॅमेरा सेन्सरसह येणार आहे. Nokia कंपनी देखील 200MP कॅमेऱ्यासह 5 रियर कॅमेरा सेटअप असलेला फोन सादर करू शकते, जो Nokia N73 नावानं बाजारात येईल. शाओमीचा देखील एक हँडसेट या सेन्सरसह येणार असल्याची बातमी आली होती.