मावळमध्ये ३ लाख २३ हजार हिंदू धर्मीय
By admin | Published: August 27, 2015 11:45 PM
पुणे : मावळ तालुक्यात राहणारे ३ लाख २३ हजार २६१ नागरिक हे हिंदू धर्मीय असून या भागातील एका धर्माची ही सर्वात मोठी संख्या असल्याचे धर्मनिहाय जनगनणेतून समोर आले आहे.
पुणे : मावळ तालुक्यात राहणारे ३ लाख २३ हजार २६१ नागरिक हे हिंदू धर्मीय असून या भागातील एका धर्माची ही सर्वात मोठी संख्या असल्याचे धर्मनिहाय जनगनणेतून समोर आले आहे.मावळ तालुक्याची एकूण लोकसंख्या ३ लाख ७७ हजार ५५९ इतकी आहे. त्यात महिलांची संख्या कमी आहे. पुरूषांची संख्या १ लाख ९८ हजार ४८७ तर महिलांची संख्या १ लाख ७९ हजार ७२ इतकी आहे. अशीच स्थिती प्रत्येक धर्मातही आहे. या भागातील सर्वच धर्मात महिलांची संख्या कमी असल्याचे दिसून आले आहे.मावळात ३ लाख २३ हजार २६१ नागरिक हे हिंदू धर्माचे आहेत. त्यापाठोपाठ दुसरा मोठा धर्म म्हणून बौध्द धर्म पुढे आला आहे. तेथे २६ हजार ८९८ नागरिक हे बौध्द धर्मीय आहेत. त्यानंतर मुस्लिम धर्माचे १६ हजार ५५१ नागरिक राहतात. ख्रिन धर्माचे ३ हजार ३५७ लोक, शिख धर्माचे ६४९ लोक, जैन धर्माचे ४ हजार ७८८ नागरिक राहतात.इतर धर्म आणि पंथांचे २६४ लोक राहतात. तर निधर्मीय असे १ हजार ७९१ लोक मावळ तालुक्यात राहतात, असे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.-------------मावळ तालुक्यातील धर्मनिहाय लोकसंख्याधर्मपुरूषमहिलाएकूण हिंदू१७०४९११५२७७०३२३२६१मुस्लिम८८७३७६७८१६५५१बौध्द१३४६११३४३७२६८९८जैन२४७०२३१८४७८८ख्रिन१६८८१६६९३३५७शिख४०७२४२६४९इतर धर्म१६४१००२६४धर्म न जाहिर केलेले९३३८५८१७९१..........................................................................एकूण लोकसंख्या१९८४८७१७९०७२३७७५५९