हिवाळा सुरु झाला की गरम पाण्याने अंघाोळ करायलाच बरे वाटते. राज्यात काही शहरात फारशी थंडीच जाणवत नसल्याने अनेकांकडे गीझरच नसतो. मात्र थंडी जाणवू लागलीच तर अशा वेळी गीझरची गरज असते. मात्र अनेकांकडे गीझरच नसेल तर त्यांनी काय करावं? तसेच गीझरमुळे कधी शॉक बसेल अशी भीतीही अनेकांना सतावते. तर त्यासाठी एक सोपा उपाय आहे ज्यामध्ये तुम्ही पाण्याच्या बादलीलाच गीझर बनवू शकता. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. तर हे शक्य आहे एका डिवाईसमुळे.
Generic heating element for geyser हे एक डिवाईस आहे जे गीझरला पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते. हे डिवाईस तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. तेही केवळ ४०० रुपयांत. तसेच यासाठी कोणत्याही इलेक्ट्रिशियनला बोलवायची गरज नाही. तुम्ही स्वत:च हे डिवाईस बसवू शकता.
कसे बसवावे डिवाईस
एक मजबूत बादली घेऊन त्यात डिवाईसच्या आकाराएवढे छिद्र करावे. तो रॉड बादलीत फिट बसवावा. त्यानंतर डिवाईसची केबल प्लग ला जोडून डिवाईस सुरु करावे. यामुळे बादलीतच पाणी गरम करण्याची सोय सहज होईल.