शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

Apple सीईओंच्या घरासह ‘ही’ १२ ठिकाणं Google Map वर पाहण्यास बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 8:13 PM

ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये असलेला हा लष्करी तळ गुगल मॅपवर पूर्णपणे ब्लर करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात Apple चे सीईओ टिम कुक यांचे घर Apple Maps आणि Google Maps वर ब्लर करण्यात आले होते. एक महिला टीम कुकचा पाठलाग करत असल्याचं समोर आल्यावर ही कारवाई करण्यात आली. पण तुम्हाला माहित आहे का? की अशी अनेक ठिकाणे आहेत जी Google Maps वर पाहता येत नाहीत? 'द सन'च्या रिपोर्टनुसार, गुगलने आपल्या नकाशावरून १० हून अधिक ठिकाणे हटवली आहेत. चला जाणून घेऊया अशाच काही खास ठिकाणांबद्दल...

1. Prison de Montlucon, France: Google ने मध्य फ्रान्समधील तुरुंग सेन्सॉर केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव फ्रेंच सरकारच्या विनंतीवरून हे २०१८ मध्ये करण्यात आले होते.

2. Moruroa, French Polynesia: मोरुरोआ हे दक्षिण प्रशांत महासागरातील एक लहान बेट आहे. त्यावर बंदी का घालण्यात आली याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या बेटाचा अण्वस्त्र इतिहास असल्याचे सांगितले जाते.

3. 2207 Seymour Avenue, Ohio: एरियल कॅस्ट्रो नावाच्या व्यक्तीने २००२ ते २००४ या काळात काही मुलींचे अपहरण केले होते. त्यांना ओहियो येथील घरात ठेवले होते. मे २०१३ पर्यंत मुलींना ओलीस ठेवले होते. गुगल मॅपवर या जागेवर बंदी घालण्यात आली आहे.

4. House in Stockton-on-Tees: यूकेमधील प्रिन्सपोर्ट रोडवर स्थित, स्टॉकटन-ऑन-टीज हे Google वर अस्पष्ट आहे.

5. Jeannette Island, Russia: बर्फाच्छादित बेट १.२ मैल लांबीचा आहे. असं मानलं जातं की रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे हे बेट गुगल मॅपवर ब्लर करण्यात आले आहे.

6. North Korea: गुगलवरही उत्तर कोरियाचे अनेक भाग अस्पष्ट आहेत.

7. Amchitka Island : अलास्का: अम्चिटका बेटावर ५०, ६० आणि ७० च्या दशकात अमेरिकेची आण्विक चाचणी करण्यात आली. मात्र गुगल मॅपवर त्यातील अनेक भाग ब्लर करण्यात आले. अमेरिकेने येथे अनेक भूमिगत अणुचाचण्या केल्या आहेत.

8. Greek military base: ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये असलेला हा लष्करी तळ गुगल मॅपवर पूर्णपणे ब्लर करण्यात आला आहे. हे सुरक्षेच्या कारणास्तव केले आहे.

9. French nuclear facility:  फ्रान्समधील AREVA ला हेग आण्विक इंधन पुनर्प्रक्रिया सुविधा देखील Google वर ब्लर आहे. ते १९७६ मध्ये उघडण्यात आले होते येथून अनेक देशांना अणुइंधन दिले जाते.

10. Polish Special Forces base: पोलंडच्या स्पेशल फोर्सेस कमांडचे प्रशिक्षण या भागात होते. हे google वर ब्लर करण्यात आले आहे.

11. Patio de los Naranjos, Spain: ही जागा स्पेनमध्ये आहे, हे ठिकाण सरकारी कार्यालयांच्या जवळ आहे. हे ब्लर का करण्यात आले याची माहिती अद्याप समोर आली नाही.

12. Tim Cook's house: Apple ने आपल्या Map मध्ये टिम कुकच्या घराचे स्थान दर्शविणारी 'अदृश्य भिंत' दाखवली होती. अशा परिस्थितीत आता टीम कुकचे घर सार्वजनिकपणे कोणीही पाहू शकणार नाही. त्याचवेळी गुगल मॅपवरही त्याच्या घराचा काही भाग पिक्सेलेटेड केला आहे. CultOfMac नुसार, टिम कुकच्या घराची किंमत २५ कोटींहून अधिक आहे. Apple च्या बॉसचे घर कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथे आहे.

टॅग्स :googleगुगल