नवी दिल्ली - लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी लवकरच तीन नवीन भन्नाट फीचर्स घेऊन येत आहे. अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर अॅपच्या बीटा व्हर्जनचा वापर करणारे युजर्स या नव्या फीचर्सची चाचणी करू शकतात. कंपनी नवीन फीचर्स ट्राय करण्याचा पर्याय देखील युजर्सना देत आहे. लवकरच युजर्सना हे फीचर्स मिळणार आहेत. व्हॉट्सअॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅप देखील आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कारण व्हॉट्सअॅपन युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं या उद्देशाने तीन नवीन फीचर्स आणत आहे.
आयफोन युजर्ससाठी ऑडिओ प्लेबॅक
आयफोन युजर्सना व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट बीटा अपडेटमध्ये ऑडिओ प्लेबॅक फीचरचा सपोर्ट मिळणार आहे. बीटा व्हर्जन 2.19.91.1मध्ये युजर्स व्हॉट्सअॅपवर शेअर करण्यात आलेल्या ऑडिओचे नोटिफिकेशन पॉप-अप करून प्ले करू शकतात. त्यामुळे अॅप ओपन न करता रिसीव्ह झालेले ऑडिओ ऐकायला मिळतील. त्यासाठी नोटिफिकेशन पॉप अप एक्सपान्ड करावं लागेल.
गुगल असिस्टेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप कॉल
लवकरच युजर्स गुगल असिस्टेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप कॉल करू शकणार आहेत. गुगल असिस्टेंट थर्ड पार्टी चॅटिंग अॅपच्या मदतीने मेसेज सेंड करण्याची सुविधा देतं. मात्र युजर्स यावरून व्हिडीओ कॉल करू शकत नव्हते. पण आता ते शक्य होणार आहे. गुगल असिस्टेंटवरून व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल हे फीचर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे युजर्स 'Hey Google' सोबत 'Whatsapp Video ( कॉल करायचा आहे त्या कॉन्टॅक्टचं नाव)' सांगून लवकरच व्हिडीओ कॉल करू शकणार आहेत.
वेबसाठी अल्बम
व्हॉट्सअॅपवर एखाद्या व्यक्तीला खूप व्हिडीओ अथवा फोटो पाठवले तर अॅप त्या फाईल्स एका अल्बमप्रमाणे दाखवतात. व्हॉट्सअॅप वेबवर अद्याप हे फीचर नव्हतं. मात्र रिपोर्टनुसार लवकरच व्हॉट्सअॅप डेस्कटॉप वेब युजर्ससाठी अशाप्रकारचं नवीन इंटरफेस रोलआऊट करण्यात येणार आहे.
Whatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं?; आता सर्वच समजणार!
Whatsappच्या 'या' नवीन फीचरमध्ये येणार फिंगरप्रिंट लॉकव्हॉट्सअॅप कंपनी युजर्सला आकर्षित करण्यासाठी नेहमीच नवनवीन फीचर्स घेऊन येते. त्यातच आता व्हॉट्सअॅप बीटामध्ये फिंगरप्रिंट लॉक हे फीचर्स वापरता येणार आहे. त्यामुळे हे नवीन फीचर्स सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणार आहे. या संबंधीत माहिती WABetaInfoने ट्विट करत दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.221 मध्ये हे नवीन फिंगरप्रिंट लॅाकची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच हे व्हर्जन उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सअॅप सेटिंगच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन 'ऑथेंटिकेशन' चे नवीन ऑप्शन उपलब्ध होईल. यानंतर युजर्स आपले फिंगर प्रिंट रजिस्टर करू शकणार आहे.