नवी दिल्ली - रिलायन्सच्या 'जिओ फोन'ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर Jio Phone 2 हा फोन लॉन्च करण्यात आला होता. 15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या फ्लॅश सेलमध्ये Jio Phone 2 च्या सर्व स्टॉकची विक्री अवघ्या काही मिनिटातच झाली. Jio Phone 2 हा इतर फोनपेक्षा खास असल्यामुळे या फोनची पाच वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
व्हिडीओ कॉलिंग
Jio Phone 2 हा एक फिचर फोन असून देखील यामध्ये व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. बाजारात असलेल्या कमी किंमतीतील फिचर फोनमध्ये व्हिडीओ कॉलिंग फिचरचा पर्याय उपलब्ध नसतो. भारतातील अनेक जण हे साध्या फोनपेक्षा स्मार्टफोनचा वापर अधिक करतात. तसेच हल्ली व्हिडीओ कॉलिंग फिचरचा वापरही मोठ्याप्रमाणात केला जातो. त्यामुळेच Jio Phone 2 मध्ये असलेली व्हिडीओ कॉलिंगची सुविधा हे या फोनच एक खास वैशिष्ट्य आहे.
मनोरंजन
Jio Phone 2 मध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठीही खास तरतूद करण्यात आली आहे. या फोनच्या माध्यमातून जिओचे एंटरटेन्मेंट अॅपचा वापर युजर्स करू शकतात. यामध्ये युजर्सला जिओ म्युझिक, जिओ टीव्ही, जिओ सिनेमासारखे मनोरंजनाचे अॅप वापरण्याची सुविधा उपलब्ध आहे. जिओने दिलेलं हे फिचर इतर कोणत्याही फिचर फोनमध्ये नाही.
व्हॉईस असिस्टंट
गूगलने सर्वप्रथम व्हॉईस असिस्टंटचा पर्याय हा जिओ फोनमध्येच दिला आहे. Jio Phone 2 मध्ये ही सुविधा हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. गूगलच्या व्हॉईस असिस्टंटच्या सुविधेमध्ये कोणतेही शब्द टाईप न करता केवळ बोलून फोन तुम्ही दिलेल्या आदेशाचं पालन करतो.
व्हॉटस्अॅप, फेसबुक, यूट्यूब
सोशल मीडियावर अनेक जण खूप वेळ घालवत असतात. व्हॉटस्अॅप, फेसबुक, यूट्यूबसारखे अॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. Jio Phone 2 मध्ये हे तिन्ही अॅप वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. इतर स्मार्टफोनच्या तुलनेत Jio Phone 2 किंमत ही अत्यंत कमी आहे. केवल 2,999 रुपयांना हा फोन उपलब्ध आहे.
स्वस्त 4G प्लॅन
रिलायन्स जिओ देशात सर्वात स्वस्त 4G इंटरनेट डेटा प्लान लॉन्च केला आहे. सर्वात स्वस्त 4G प्लॅन इतर कोणतीही कंपनी देत नसल्याने सध्या जिओला जास्तीची मागणी आहे. कंपनीच्या ऑफरमध्ये तुम्ही जुना फिचर फोन दिल्यास नवा Jio Phone 2 हा केवळ 501 रुपयात मिळणार आहे.