नवी दिल्ली - आपण जुना अॅन्ड्रॉईड फोन वापरत आहात? जर वापरत असाल, तर आपल्याला आपला फोन अपग्रेड करणे अत्यंत आवश्यक आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, आता आपल्याला कुठल्याही सुरक्षित वेबसाईटवर जाता येणार नाही अथवा ब्राऊजिंगही करता येणार नाही. कारण आपला अॅन्ड्रॉईड फोन 7.1.1 Nougat अथवा दुसऱ्या व्हर्जनवर काम करत आहे. जो अत्यंत जुना झाला आहे. अशात, जेव्हा आपन आपल्या फोनवर एखादी सुरक्षित वेबसाईट चालवाल, तेव्हा आपल्याला एक एरर मेसेज दिसेल.
अँड्रॉइड पॉलिसीसंदर्भातील एका अहवालानुसार, आता यूझर्स कुठलीही सुरक्षित वेबसाईट अॅक्सेस करू शकणार नाही. वेबसाइट्सवर जाताच आपल्याला फेल टू लोड, असा मेसेज दाखवेल अथवा यासाठी आपल्याकडे योग्य सर्टीफिकेट नाही, अशी माहिती दिली जाईल.
हा बदल होण्याचे कारण असे आहे, की लेट्स एन्क्रिप्टने (Let’s Encrypt) सर्टिफिकेशन अथॉरिटी इंडिया ट्रस्ट (IdenTrust)सोबत आपल्या भागिदारीसंदर्भात घोषणा केली आहे. जी 30 सप्टेंबर 2021 ला संपुष्टात येईल. Let’s Encrypt ही जगातील लिडिंग सर्टिफिकेट अथॉरिटींपैकी एक आहे. ही वेब डोमेन्सच्या 30 टक्के सर्टिफिकेशन्सचा वापर करते.
Let’s Encrypt ने म्हटले आहे, काही सॉफ्टवेअर्स 2016 पासून अपडेट करण्यात आलेली नाहीत. अशात, ज्या लोकांना वेबसाईट्स अॅक्सेस करायच्या आहेत. मात्र, आपला फोन अपग्रेड करायचा नाही, असे लोक फायरफॉक्सचा वापर करून वेबसाइट्स अॅक्सेस करू शकतात. या बदलामुळे, तब्बल 33.8 टक्के अॅन्ड्रॉईड डिव्हाईसमध्ये सर्टिफिकेट एरर दिसायला सुरुवात होईल. यामुळे आपल्याकडे केवळ, वर सांगण्यात आलेलाच एकमेव पर्याय आहे.