जर तुम्ही शॉर्ट टर्म लोनच्या बाबतीत कोणतेही अॅप डाउनलोड केलं असेल तर ते तुम्हाला महागात पडू शकतं. कारण चिनी घोटाळेबाज आता तुमच्या फोनमध्ये प्रवेश करून तुमचा डेटा चोरत आहेत आणि तुमचं खातं रिकामं करत आहेत. देशातील प्रत्येक ५ पैकी एका व्यक्तीनं चायनीज लोन अॅप डाउनलोड केलं आहे. ही संख्या सातत्यानं वाढत आहे. जर तुम्हीही असे शॉर्ट टर्म लोन अॅप डाउनलोड केलं असेल तर ते कसं टाळता येईल हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
या अॅपद्वारे चिनी सायबर क्राइम करणारे जबरदस्तीने तुमच्या बँकेत पैसे पाठवतात. यानंतर, तुमच्या खात्याचा तपशील घेऊन तुमचं खातं रिकामं करतात. अनेकदा अल्पमुदतीच्या कर्जाच्या लोभापायी लोक यात अडकतात. मग ते कर्ज वसुलीचं कंत्राट भारतीयांना देतात. प्रत्येक अॅपचे वेगवेगळे रिकव्हरी एजंट असतात. जे तुमच्याकडून कोणत्याही प्रकारे पैसे वसुल करण्यात निष्णात असतात. मग जर तुमचा तपशील त्यांच्याकडे असेल तर ते तुमचे खातं देखील पाहू शकतात.
कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?छोटी-मोठी गरज असली तरी असे कोणतेही अॅप डाउनलोड करू नका. अशा अॅप्सपासून नेहमी अंतर ठेवा. जर तुम्ही आधीच डाउनलोड केलं असेल आणि फसवणूक होऊ शकते असा संशय येत असेल तर लगेच तुमचा नंबर बदला. फसवणुकीची तक्रार तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात करा. जेणेकरून पोलिसांना त्यांच्यावर वेळीच कारवाई करता येईल. तुमचं खातं रिकामं करण्याव्यतिरिक्त, चिनी अॅप्स गॅलरी, पासवर्ड, संपर्क यांसारख्या तुमच्या सर्व वैयक्तिक डिटेल्ससाठी धोकादायक आहेत. हे अॅप्स डाऊनलोड केल्यानं तुमच्या मोबाईलचा संपूर्ण अॅक्सेस त्यांना मिळतो.
पुढील अॅप्स अजिबात डाऊनलोड करू नका
- मोबीपॉकेट
- इन्फिनिटी कॅश
- Kredit Mango
- मिनट कॅश
- गो कॅश
- कॅश लाइट