देशात काही महिन्यापूर्वी 5G सेवा सुरू झाली. आता देशभरात 5G चे नेटवर्कस सुरुवात झाली आहे, यामुळे आता 5G सिम अपग्रेड करण्याचे काम सुरू आहे. यातच सायबर फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यांना रोखण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने अलर्ट जारी केला आहे. TRAI ने मेसेजद्वारे टेलिकॉम यूजर्सना अलर्ट दिला आहे.
सोने, चांदी, तांबे, अॅल्युमिनियम...दुर्मिळ धातूंपासून बनतो iPhone; पाहा डिटेल्स..
हा अलर्ट 5G सिमशी संबंधीत आहे. जर वापरकर्ते 5G सिम अपग्रेड करणार असतील तर त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. या गोष्टींची काळजी न घेतल्यास तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
सिम अपग्रेड करताना 'या' चुका टाळा
TRAI वापरकर्त्यांच्या फोनवर एक अलर्ट पाठवत आहे, यात टेलिकॉम कंपन्या वापरकर्त्यांना 5G सिम सक्रिय करण्यासाठी OTP विचारत नाहीत. एवढेच नाही तर या काळात कोणत्याही प्रकारची माहिती विचारली जात नाही. तुमचे सिम अपग्रेड करण्याच्या बहाण्याने कोणी तुम्हाला OTP किंवा तपशील मागितल्यास, तो देऊ नका.
तुम्हाला तुमचे सिम 5G वर अपग्रेड करण्यासाठी लिंक पाठवली गेली आणि त्यावर क्लिक करण्यास सांगितले गेले, तर तुम्हाला सावध राहावे लागेल. सायबर फ्रॉड अंतर्गत अशा प्रकारची लिंक पाठवली जाते. तुम्ही चुकून या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या पैशांसह तुमची माहितीही चोरीला जाऊ शकते.
अनेकवेळा हॅकर्स वापरकर्त्यांना 5G वर अपग्रेड करण्याची ऑफर देतात. यामध्ये अनेक प्रकारची आमिषे दिली जातात. जर तुम्ही या लोभात अडकलात, 5G सेवेसाठी कोणत्याही मोबाइल वापरकर्त्याला कोणत्याही प्रकारची ऑफर दिली जात असेल, तर या परिस्थितीकडेही दुर्लक्ष करावे लागेल. ही तुमची फसवणुकी असू शकते.