शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

‘या’ लोकांना वापरता येणार नाही VPN, Google Drive; भारत सरकारचा नवा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 10:48 AM

कम्प्युटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम (Cert-In) नं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.  

केंद्र सरकारच्या कम्प्युटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम (Cert-In) नं सरकारी कर्मचाऱ्यांना थर्ड पार्टी VPN वापरण्यास मनाई केली आहे. तसेच अंतर्गत आणि गोपनीय सरकारी फाईल्स Google Drive, Dropbox सारख्या गैरसरकारी क्लाउड सर्विसवर अपलोड करण्यास मनाई केली आहे. सेंटर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल इंफॉर्मेटिक्स सेंटर म्हणजे (NIC) नं म्हटलं आहे की, सरकारनं ही नियमावली सायबर सिक्योरिटीच्या दृष्टीनं जारी केली आहे.   

सरकारने कर्मचार्यांना थर्ड पार्टी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे VPN वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. सरकारचा हा निर्णय Express VPN, Surfshark आणि Nord VPN सारख्या खाजगी विपीएन कंपन्यांनी भारत सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आली आहे. भारतात विपीएन सर्व्हिस प्रोव्हायडर्सना युजर्सचा डेटा 5 वर्ष साठवून ठेवावा लागेल अशी नियमावली भारतीय कम्प्युटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम (Cert-In) नं काही दिवसांपूर्वी जारी केली होती.  

NIC चे आदेश 

NIC नं सरकारी विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्ट किंवा आउटसोर्स रिसोर्समध्ये सायबर सिक्योरिटीविषयी जागरूकता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना डिजिटल वर्ल्डमध्ये काय करावं आणि काय करू नये याची माहिती मिळेल. त्यासाठीच ही नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.  

तसेच NIC नं सरकारी कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे की, त्यांनी कधीही ‘जेलब्रेक’ करू नये आणि CamScanner सारखी स्कॅनर सर्विस देणाऱ्या अ‍ॅपचा वापर करू नये. खासकरून सरकारी कागदपत्र या अ‍ॅप्समधून स्कॅन करू नये. 2020 मध्ये चीनी अ‍ॅप CamScanner आणि इतर अनेक अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. तेव्हापासून सरकारी कार्यालयांमध्ये सायबर सिक्योरिटला जास्त महत्व दिलं जात आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान