नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील ललितपूर या छोट्याशा शहरात राहणारे 3 मित्र एकेकाळी भीषण आर्थिक अडचणीचा सामना करत होते. यातून मार्ग काढण्यासाठी तिघांनी मिळून काहीतरी करण्याचा विचार केला. यानंतर त्यांनी एक कंपनी (GRAPS MARKETING) तयार केली आणि इस्टाग्राम मार्केटिंगमधून ते आता कोट्यधीश झाले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे त्यांची कंपनी सध्याच्या घडीला वर्षाला एक कोटी रुपयांचा व्यवसाय करते.
अशी सुरू केली कंपनीआपण ज्या तीन मित्रांबद्दल भाष्य करत आहोत ते केवळ 20 वर्षांचे आहेत. मोहम्मद असद, मोहित शर्मा आणि प्रल्हाद कुशवाह अशी या 3 तरूण व्यावसायिकांची नावे आहेत. तिघेही उत्तर प्रदेशातील ललितपूरचे रहिवासी आहेत. हे तिघेही इस्टाग्राम इन्फ्लुएंसर्स मार्केटिंग कंपनीकडून कोट्यवधी रुपये कमवत आहेत. मोहम्मद असद 'GRAPS MARKETING' नावाने स्वतःचा स्टार्टअप चालवत आहेत. तर मोहित आणि प्रल्हाद हे त्याच्या कंपनीत भागीदार आहेत, ज्यांची समान भागीदारी आहे. खरं तर हे तिन्ही मित्र 'ग्रेप्स मार्केटिंग' या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. हे ब्रँड आणि इन्फ्लुएंसर्स यांना एकमेकाशी जोडण्याचे काम करतात.
दरम्यान, ही कंपनी ब्रँड आणि इन्फ्लुएंसर्स यांना एकमेकांशी जोडून ठेवते. अर्थात इन्फ्लुएंसरचा व्हिडीओ इस्टाग्राम किंवा इतर कोणत्या फ्लॅटफॉर्मवर सुरू असेल तर ते एखाद्या ॲप किंवा प्लॅटफॉर्मची जाहिरात करतात. यामध्ये असदच्या कंपनीचे काम इन्फ्लुएंसर आणि बॅंड यांच्यात करार करणे हे आहे. यातूनच त्यांच्या कंपनीला नफा मिळतो.
एकेकाळी विकली होती भाजीया तीन मित्रांमधील प्रल्हाद कुशवाह याचे वडील एकेकाळी भाजी विकण्याचा व्यवसाय करत होते. तर असदच्या वडिलांचे इलेक्ट्रिकचे छोटे दुकान आहे. मोहितचे वडील सरकारी नोकरी करतात. तिघांनाही त्यांच्या ग्रॅज्युएशन दरम्यान इंटरनेटवरून इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर मार्केटिंगबद्दल माहिती मिळाली होती. त्यांनी याआधी याविषयी अनेक ब्लॉग लिहले आहेत.
असे मिळाले यश या तिघांनी त्यांच्या यशाची कहाणी सांगताना म्हटले, 2020 मध्ये जेव्हा संपूर्ण देश कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये होता, त्यावेळी त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. याच काळात त्यांनी इंटरनेटवर इन्फ्लुएंसर मार्केटिंगचे बारकावे शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी कुटुंबीयांकडून 50 हजार रुपये घेतले होते.
सध्या या तिघांच्या कंपनी सोबत 20 हजारांहून अधिक इन्फ्लुएंसर्स जोडले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते लहान ब्रँड्स याशिवाय लहान व्हिडीओ आणि शेअरिंग ॲप्स तसेच एज्युकेशन ॲप्लिकेशन्स सारख्या प्लॅटफॉर्मशी कनेक्ट होतात. यासाठी ते 10 टक्के कमिशन फी घेतात. यातूनच त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळत आहे.