नवी दिल्ली - शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ होती. मात्र केंद्रातील मोदी सरकारने चीनला मोठा दणका दिला. लोकप्रिय अॅप टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि हॅलो अॅप यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे. मात्र बंदीनंतर टिकटॉक जास्तच धोकादायक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. पण तरी देखील सायबर क्रिमिनल्स टिकटॉकच्या मदतीने स्मार्टफोन युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. फेक लिंकच्या माध्यमातून युजर्सवर अटॅक केला जात आहे. मालवेअर इंजेक्ट केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. बनावट लिंकच्या मदतीने व्हॉट्सअॅप युजर्सना टार्गेट केलं जात आहे. यासोबतच मेसेजवरून ही लोकांना लक्ष्य केलं जात आहे. भारतात सायबर क्रिमिनल्स टिकटॉकवरील बंदीचा फायदा उठवून टिकटॉक व्हिडीओची लिंक पाठवतात आणि निशाणा साधतात.
टिकटॉक व्हिडीओ पाहण्यासाठी युजर्स मॅलिशस लिंकवर क्लिक करतात आणि जाळ्यात ओढले जातात. अशा लिंकवर क्लिक केल्यास युजर्सची सुरक्षितता धोक्यात येते. त्यांचा महत्त्वाचा डेटा चोरला जाऊ शकतो. यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोशल मीडियावर असे अनेक फेक मेसेज येत असतात. ज्यामध्ये टिकटॉक डाऊनलोड करण्याची ऑफर दिली जात आहे. मात्र हे सगळं धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे.
सावधान! 3 वर्षांनी पुन्हा आलाय 'हा' खतरनाक Android Virus; फक्त एक मेसेज अन्...
काही महिन्यांपूर्वी फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान आता आणखी एका व्हायरसचं सावट असल्याची मााहिती समोर आली आहे. धोकादायक आणि पॉवरफुल असलेला एक जुना व्हायरस तब्बल तीन वर्षांनी परतला आहे. धक्कादायक म्हणजे हा व्हायरस बँक डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती सहज चोरू शकतो. फेकस्काय (Fakesky) असं या मॅलवेअरचं नाव असून ऑक्टोबर 2017 मध्ये सापडला होता. त्यावेळी या व्हायरसने जपान आणि दक्षिण कोरियामधील लोकांना त्याचे लक्ष्य बनवले होते. मात्र आता Cybereason Nocturnus के रिसर्चर्स हा व्हायरस जगभरातील युजर्सना त्याचे लक्ष्य करत असल्याची माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या संकटात देशातील 62 टक्के मुलांचं थांबलं शिक्षण, धक्कादायक अहवाल
CoronaVirus News : ट्रम्प यांचा 'हा' लूक पाहिलात का?, पहिल्यांदाच लावला मास्क अन्...
CoronaVirus News : "फक्त फुफ्फुसांवर नाही तर शरीरातील 'या' अवयवांवर हल्ला करतो कोरोना"
या देशाला आज मनमोहन सिंगांची गरज आहे, कारण...; शरद पवारांचं स्पष्ट मत
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! पीपीई किट परिधान करून पानवाला चालवतोय टपरी