2020 साली भारत सरकारनं 250 पेक्षा जास्त अॅप्सवर बंदी घातली होती. यात पबजी, TikTok, अलीबाबा आणि अन्य लोकप्रिय ऍप्सचा समावेश होता. यातील पबजीनं भारतात नाव बदलून (बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया) पुनरागमन केलं आहे आणि आता लोकप्रिय शॉर्ट व्हिडीओ शेयरिंग ऍप टिकटॉक देखील याच स्ट्रॅटेजीचा वापर करू शकते. टिकटॉकची पॅरेंट कंपनी Bytedance भारतात पुनरागमन करण्यासाठी एका नवीन भागेदारीची शोध घेत आहे.
नव्या नावानं पुन्हा लाँच होऊ शकतं टिकटॉक?
इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, बाईटडान्स भारतात हिरानंदानी ग्रुप सोबत भागेदारी करू शकते. यासाठी कंपनीनं बोलणी सुरु केली आहे. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी या योजनेची माहिती देताना म्हटलं आहे की, “आतापर्यंत आमच्यकडे कोणतीही अधिकृत बोलणी करण्यात आली नाही, परंतु आम्हाला योजनेची सूचना देण्यात आली आहे. जेव्हा ते मंजुरीसाठी आमच्याकडे येतील तेव्हा या विनंतीचा विचार केला जाईल.”
काही महिन्यांपूर्वी बाईटडान्सनं 6 जुलैला “TickTock” नावासह टिकटॉकसाठी ट्रेडमार्क दाखल केला आहे. या ट्रेडमार्क संबंधित किंवा देशातील टिकटॉकच्या पुन्हा एंट्री करण्याच्या बातमीबाबत बाईटडान्सनं कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु कंपनी कर्मचाऱ्यांची भरती करत आहे. त्यामुळे भारत सरकारच्या सर्व नियमांची पूर्तता केल्यास पुन्हा एकदा टिकटॉक भारतात एंट्री घेऊ शकतं. फक्त यावेळी इंस्टग्राम, युट्युब शॉर्ट्स, चिंगारी, शेयरचॅट, मोज, जोश इत्यादी अनेक अॅप्सकडून चांगली टक्कर मिळू शकते.
हिरानंदानी ग्रुप
हिरानंदानी ग्रुप भारतातील सर्वात मोठ्या रियल इस्टेट ग्रुप पैकी एक आहे. ज्यांचे अनेक प्रोजेक्ट्स मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईमध्ये आहेत. तसेच Yotta Infrastructure Solutions अंतगर्त ते डेटा सेंटर देखील चालवतात. अलिडकेच त्यांनी एक कंज्यूमर सर्विस आर्म Tez Platforms देखील लाँच केलं आहे.