शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

TikTok ची कंपनी भारतातून व्हिडीओ अ‍ॅप बंद करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 9:01 AM

एप्रिल 2020 मध्ये टिकटॉकने 100 कोटींपेक्षा जास्त आकडा पार केला होता. कमी कालावधीच्या व्हिडीओमुळे युजर टिकटॉकला पसंती देत आहेत.

नवी दिल्ली : टिकटॉक अ‍ॅप बनविणारी कंपनी बाइटडान्स (ByteDance) भारतातून भारतातून दोन अ‍ॅप बंद करणार आहे. यामध्ये टिकटॉक नाही तर वीगो विडियो (Vigo Video)  आणि वीगो लाइट (Vigo Lite) या दोन अ‍ॅपचा समावेश आहे. 

बाइटडान्स कंपनीने वीगोवरील युजरना त्यांचा डेटा टिकटॉक अ‍ॅपवर ट्रान्सफर करण्याची सूचना केली आहे. कंपनीने वीगो व्हिडीओच्या एका वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. वीगोची अ‍ॅप 31 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहेत. तोयपर्यंत युजर टिकटॉकवर ट्रान्सफर होऊ शकणार आहेत. Entracker नुसार हे अ‍ॅप ब्राझील आणि मध्ये पूर्वेतील देशांमध्ये बंद करण्यात आले आहे. कंपनीचे म्हणने आहे की, हे अ‍ॅप बंद करून कंपनी दुसऱ्या व्यवसायाकडे लक्ष देणार आहे. कंपनीने हे व्हिडीओ मेकिंग अ‍ॅप 2017 मध्ये लाँच केले होते या प्लॅटफॉर्मवर 15 सेकंदांपर्यंत व्हिडीओ बनविले जाऊ शकतात. या अ‍ॅपवर वेगवेगळे डान्स, फूड, स्टंट, ब्युटी, आर्ट, कॉमेडी, म्युझिक सारखे व्हिडीओ तयार केले जाऊ शकत होते. 

गुगल प्ले स्टोअरवर वीगो अ‍ॅपला 100 मिलिअनपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड केले गेले होते. हा आकडा जगभरातील डाऊनलोडचा आहे. मात्र, भारतात टिकटॉक खूप प्रसिद्ध झालेले आहे. यामुळे वीगो अ‍ॅपला जास्त प्रतिसाद मिळाला नाही. भारतात वीगोचे ४ मिलिअन युजर तर लाईट अ‍ॅपचे 1.5 मिलिअन युजर आहेत. 

एप्रिल 2020 मध्ये टिकटॉकने 100 कोटींपेक्षा जास्त आकडा पार केला होता. कमी कालावधीच्या व्हिडीओमुळे युजर टिकटॉकला पसंती देत आहेत. यामध्ये युजर स्वत:चे व्हिडीओ पोस्ट करण्याबरोबरच दुसऱ्यांचे व्हिडीओ पाहून मनोरंजन करता येते. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने बरेचजण घरात होते. यामुळे टिकटॉक अ‍ॅपवर व्हिडीओंचा पूर आला होता. तसेच डाऊनलोडही वाढले होते. यामुळे टिकटॉक आता फेसबुकच्या Lasso, इन्स्टाग्रामला कडवी टक्कर देत आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

"सुशांत कसा आहे?" मृत्यू सहन होईना; वहिनीने सोडला प्राण

भविष्यवाणी! भारतावर मोठे संकट; 4.4 डिग्रीने पारा चढणार

जग दुसऱ्या मोठ्या महामारीच्या उंबरठ्यावर; सिंहाच्या हाडांपासून औषध, मद्याची निर्मिती घातक

दंग्याचा त्रास होत होता; शेजाऱ्याच्या दोन मुलांना चौथ्या मजल्यावरून फेकले

CoronaVirus जून-जुलै नाही, नोव्हेंबर धोक्याचा! कोरोना उत्पात माजवणार; ICMR चा अंदाज

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकchinaचीन