Valentine's Day च्या आधी लोकप्रिय डेटिंग अॅप Tinder नं Blind Date नावाचं नवीन फीचर सादर केलं आहे. या फीचरच्या माध्यमातून ब्लाईंड डेटचा क्लासिक अनुभव युजर्सना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. टिंडरनं हे फिचर तरुण युजर्सना आकर्षित करण्यासाठी सादर केलं आहे, अशी चर्चा आहे. स्मार्टफोन्स येण्याच्या आधी रोमान्सचा जो अनुभव होता तो देण्याचं काम Tinder Blind Date फीचर करेल.
Gen Z युजर्स म्हणजे 18 ते 25 वर्षाच्या युजर्सना लक्ष्य करण्यासाठी हे फिचर सादर करण्यात आल्याचं टिंडरनं म्हटलं आहे. ऑथेंटिक कनेक्शन शोधण्यासाठी यात फोटोच्या ऐवजी व्यक्तिमत्व आणि बोलणं यातून फर्स्ट इम्प्रेशन बनवता येईल. जे युजर्स साथीदार शोधताना लूकच्या आधी पर्सनॅलिटीला प्राधान्य देतात, अशा युजर्ससाठी हे फिचर महत्वाचं ठरेल.
असं करेल काम
Blind Date फिचरमध्ये तुम्ही दुसऱ्या युजरला न बघता त्यांच्याशी चॅट करू शकाल. चॅटिंगनंतर दोन्ही मेंबर्स ठरवून एकमेकांचं प्रोफाईल आणि फोटो बघू शकतील. या फिचरसाठी युजर्सना आधी काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. त्यांच्या आधारावर त्यांच्या जोड्या बनवल्या जातील आणि एक वेळेची मर्यादा असलेली चाट ओपन होईल. एकमेकांची माहिती न देता त्यांना मल्टीपल चॉईस प्रॉम्पटची उत्तरं द्यावी लागतील.
वेळ संपल्यावर दोन्ही युजर्सना एकमेकांचे प्रोफाईल लाईक करण्याचा पर्याय देण्यात येईल. जर दोघांनी लाईक केले तर मॅच होऊन त्यांना एकमेकांची माहिती दिली जाईल. युजर्स नवीन जोडी देखील शोधू शकतात. सध्या Blind Date फिचर अमेरिकेत उपलब्ध झालं आहे. लवकरच हे जागतिक स्थरावर उपलब्ध होऊ शकतं.
हे देखील वाचा: