नवी दिल्ली - सध्या स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांकडेच तो असतो. पर्सनल ते प्रोफेशनल अशी सर्वच कामं फोनच्या मदतीन अगदी झटपट करता येतात. ऑनलाईनचं जग असल्याने हल्ली अनेक व्यवहार हे स्मार्टफोनवरच होतात. तर सर्वांचेच खासगी फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वाची माहिती ही फोनमध्ये स्टोर केलेली असते. अशा स्थितीमध्ये फोनची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. आपला फोन इतरांनी वापरू नये यासाठी आपण फोनला पॅटर्न, पिन अथवा पासवर्डद्वारे लॉक करत असतो.
काहीवेळा लहान मुलांच्या हातात फोन गेला तर ते चुकीचा पासवर्ड टाकून फोन लॉक करतात. तर कधी कधी कामाच्या गडबडीत आपणही स्वतःच सेट केलेला पासवर्ड विसरून जातो. अशा स्थितीमध्ये फोनला पुन्हा अनलॉक करताना मोठी समस्या येते. जर तुम्ही देखील फोनचा पासवर्ड विसरला असल्यास आता काळजी करण्याची गरज नाही. एका खास ट्रिकद्वारे तुम्ही स्मार्टफोन सहज अनलॉक करू शकता. याबाबत जाणून घेऊया....
असा अनलॉक करा स्मार्टफोन
- ही ट्रिकला फॉलो केल्यावर तुमचा फोन अनलॉक होईल, परंतु यातील सर्व महत्त्वाचा डेटा डिलीट होईल.
- यासाठी तुम्हाला सर्वातआधी लॉक झालेल्या फोनला रिकव्हरी मोडमध्ये आणावे लागेल.
- रिकव्हरी मोडमध्ये आणण्यासाठी फोनला स्विच ऑफ करून एक मिनिटं वाट पाहा.
- सर्वात प्रथम पॉवर बटण आणि वॉल्यूम डाऊन बटणला एकसोबत दाबा.
- थोड्या वेळाने फोन रिकव्हरी मोडमध्ये येईल.
- येथे तुम्हाला Factory Reset चा पर्याय सिलेक्ट करावा लागेल.
- आता सर्व डेटा क्लिअर करण्यासाठी Wipe Cache पर्याय निवडा.
- काही वेळानंतर फोनला पुन्हा सुरू करावे लागेल.
- या ट्रिकच्या मदतीने तुम्ही पासवर्ड, पॅटर्न आणि पिनमुळे लॉक झालेल्या फोनला अनलॉक करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.