अनेकदा स्मार्टफोन वापरताना त्याचा टच काम करत नाही आणि अशातच स्क्रीनही हॅंग होते. याने अनेक समस्या निर्माण होतात. अशात तुम्ही ना कॉल रिसीव्ह करु शकत ना दुसऱ्या कोणत्या अॅपवर क्लिक करु शकत. कधी कधी तर पुन्हा पुन्हा टच केल्याने फोन हॅंग होतो आणि स्क्रीन ब्लॅक होते. अशावेळी आपल्याकडे सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याव्दारे तुम्ही तुमच्या फोनचा खराब टच ठीक करु शकता.
स्क्रीन कव्हर आणि स्टीकर हटवा
सर्वातआधी तर तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन चेक करा. फोन कव्हर व्यतिरिक्त स्क्रीनचं कव्हर आणि जर कोणतं स्टिकर लागलं असेल तर ते काढून टाका. असे केल्यानेही तुमच्या फोनचा टच स्क्रीन ठीक होईल. अनेकदा असं होतं की, स्क्रीनवर लागलेल्या कव्हरमुळेही टच रिस्पॉन्ड करत नाही.
बिनकामाचे अॅप्स डिलीट करा
अनेकदा फोनच्या टचमध्ये अडचण निर्माण होण्याचं कारण काही अॅप्सही असू शकतात. म्हणजे तुमच्या फोनमध्ये असेही काही अॅप्स असतात जे ऑटोमॅटीक डाऊनलोड झालेले असतात. अशा अॅप्समुळेही फोनच्या टचमध्ये समस्या होते. अशात ते अॅप्स डिलीट करा.
फोन रि-स्टार्ट करा
फोनच्या टचमध्ये निर्माण होणारी समस्या ही फोन रि-स्टार्ट केल्यानेही ठीक होऊ शकते. अनेकदा फोन केवळ रि-स्टार्ट करुनही योग्यप्रकारे काम करु लागतो.
रिकव्हरी मोडमध्ये टाका फोन
जर फोनच्या स्क्रीनमध्ये स्क्रॅच आला असेल किंवा तुटली असेल तर फोनचा टच योग्यप्रकारे काम करणार नाही. अशात तुम्हाला फोन रि-स्टार्ट करावा लागेल आणि तरीही टच योग्यप्रकारे काम करत नसेल तर फोन रिकव्हरी मोडवर बूट करा. यासाठी फोनचं पॉवर ऑफ बटण आणि व्हॉल्यूम वाढवण्याचं बटण एकत्र दाबा. जेव्हा अॅन्ड्रॉईडचा पर्याय आला तर पॉवरचं बटण रिलीज करा. त्यानंतर व्हॉल्यून बटणाद्वारे wipe data किंवा factory reset चा पर्याय सिलेक्ट करा. त्यानंतर पॉवर बटण प्रेस करा.
या सवयींमुळे खराब होतो टच
फोनच्या टचमध्ये समस्या निर्माण होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. तुमचे हात ऑयली असतील किंवा घाम येत असेल तर टच स्क्रीन हॅंग होणार. फोन टच करण्यापूर्वी तुमचे हात चांगल्याप्रकारे स्वच्छ करा आणि कोरडे करा.