भारतात वापरल्या जाणारे पाचपैकी चार स्मार्टफोन हे अॅन्ड्रॉइड ऑपरेटींग सिस्टमवर चालतात. स्मार्टफोन घेताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात. पण फोन घेतल्यावर अनेकजण हे फोनच्या सुरक्षेकडे अजिबातच लक्ष देत नाहीत. असेही म्हणता येईल की, अनेकांना फोनमधील सिक्युरिटी फिचर्सबाबत काहीच माहीत नसतं. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना काही लोकांना करावा लागतो. हा त्रास होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला फोनच्या सुरक्षेबाबत काही खास गोष्टी सांगणार आहोत.
योग्य पासवर्डची निवड
तुमचा फोन सुरक्षित करण्यासाठीची ही पहिली स्टेप आहे. प्रत्येक फोनमध्ये सिक्युरिटीसाठी पासकोड लॉक असतं आणि आता जास्तीत जास्त स्मार्टफोनमध्ये सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर फिचर दिलं गेलंय. पासकोड सेट करताना तो फार काळजीपूर्वक निवडावा. सहज कुणाला कळेल किंवा अंदाज बांधता येईल असा असू नये. जन्मतारीख, कारचा नंबर किंवा मोबाइल नंबर असू नये.
फोन आणि अॅप्स अपडेट ठेवा
अॅन्ड्रॉइड फोनच्या सुरक्षेसाठी सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे आपला फोन सतत अपडेट करावा. पण अनेकजण असं करताना दिसत नाही. गुगल सतत सर्वच स्मार्टफोन कंपन्यांसाठी सिक्युरिटी अपडेट आणतं. जे यूजर्सपर्यंत अपडेट म्हणून पाठवलं जातं. त्यामुळे आपला फोन नेहमी अपडेट करत रहा.
याचप्रकारे अॅप डेव्हलपर्स सतत प्ले स्टोरवर आपल्या अॅप्सचे नवे फीचर्स आणि सिक्युरिटी अपडेट देत असतात. अपडेट इन्स्टॉल करण्याआधी माहितीही दिलेली असते की, अपडेटेड अॅपमध्ये कोणते फीचर्स दिले जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय अॅपचं काम चालावं यासाठी अॅप अपडेट करत रहावे.
कोणते अॅप्स डाऊनलोड करता
गुगल प्ले स्टोरवर यूजर्ससाठी असलेल्या अॅप्सच्या तपासणीसाठी एक वेगळं डिपार्टमेंट आहे. हे डिपार्टमेंट यूजर्स या अॅपपर्यंत पोहोचण्याआधी हे अॅप डिलीट करतात. पण आणखीही काही वेगळे सोर्सेस आहेत जेथून हे अॅप डाऊनलोड केले जाऊ शकतात. पण ते सुरक्षित आहेत की नाही ही चेक करण्यासाठी कोणतीही सिक्युरिटी सिस्टीम नाही. त्यामुळे माहीत नसलेल्या सोर्सवरुन अॅप्स डाऊनलोड करणे डिसेबल करा. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन सिक्युरिटीमध्ये जावे. इथे तुम्हाला ‘Install apps from Unknown Sources' हा पर्याय दिसेल. हा स्विच ऑफ करा.
सिक्युरिटी अॅप्स करा इन्स्टॉल
कम्प्युटरमधून डेटा चोरी होण्याची जितकी भीती असते तितकीच फोनमधूनही डेटा चोरीची भीती असते. तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल सिक्युरिटी अॅप्ससारखेच फोनमध्येही सिक्युरिटी अॅप डाऊनलोड करा. Avast, Bitdefender, McAfee, Norton, Kaspersky, Trend Micro सारख्या कंपन्यांचे सिक्युरिटी अॅप्स उपलब्ध आहेत. तुम्हाला पेड किंवा मोफत यानुसार यात फीचर मिळतील. यात ऑटोमॅटिक स्कॅन, मेलवेअर डिटेक्शन, अॅंटी-थेफ्ट, कॉल ब्लॉकिंग, रिमोट लॉक, प्रायव्हेसी स्कॅनर इत्यादी फीचर्स मिळतात.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर
जास्तीत जास्त यूजर्स हे सिक्युरिटी फीचर वापरण्याकडे दुर्लक्ष करतात. कारण हे वापरणे जरा किचकट काम आहे. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रक्रियेमध्ये एका पासकोडसोबतच अॅप किंवा ओटीपीच्या माध्यमातून एक यूनीक ऑथेंटिकेशन कोडही जनरेट होतो. हे फीचर आता गुगल, फेसबुक, इन्स्टाग्राम, अॅपल, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन यावरही मिळतं.
तुम्ही कोणत्याही सर्व्हिसच्या सिक्यु्रिटी सेटिंगमध्ये जाऊन हे फीटर अनेबल करु शकता. जर कुणाला तुमचा पासवर्ड मिळाला तरी ऑथेंटिकेशन बटनशिवाय तो तुमचा डेटा अॅक्सेस करु शकत नाही.
अॅप्सला लॉक
अनेक स्मार्टफोन ब्रॅन्ड आता हॅंडसेट्समध्ये हे फीचर देत आहेत. म्हणजे तुम्ही पासकोड किंवा फिंगरप्रिंट स्कॅनच्या मदतीने कोणतही अॅप लॉक करु शकता. याने तुमचा डेटाही सुरक्षित राहतो. जर तुमच्या फोनमध्ये हे फीचर नाहीये तर थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून AppLock आणि Norton AppLock इन्स्टॉल करुन तुम्ही हे फीचर मिळवू शकता.