- श्री. रायन पिंटो
कोरोना साथीच्या काळात घरात राहिल्यामुळे इनडोअर उपक्रमांना खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. मोठ्यांना घरून काम करताना आव्हानांचा सामना करावा लागत आहे, तर लहान मुले वेळ घालवण्यासाठी विविध छंद जोपासण्यात गुंतली आहेत. काही मुले विस्तारित सुट्यांचा आनंद घेत आहेत, तर काही जणांचा पुढील इयत्तांचा अभ्यास यापूर्वीच सुरू झाला आहे. देशभरातील बहुतेक शाळांनी ई-लर्निंग कार्यक्रम आणि ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ऑनलाइन सत्रे घेण्याचे प्रशिक्षणशिक्षकांना दिले जात आहे. ई-लर्निंगमधील समस्या दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ई-लर्निंगदरम्यान कराव्यात आणि करू नयेत अशा काही बाबी खाली दिल्या आहेत.
हे करा
१. स्थिर इंटरनेट जोडणी घेणे
ई-लर्निंगसाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे चांगले व स्थिर इंटरनेट कनेक्शन घेणे. ऑनलाइन सत्रांदरम्यान कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, कारण, इंटरनेटच्या वाईट कनेक्शनमुळे एखादा मुद्दा किंवा त्याचे स्पष्टीकरण विद्यार्थ्याच्या अवधानातून सुटू शकते.
२. पुरेसा प्रकाश असलेली जागा ई-लर्निंगसाठी निवडणे
ई-लर्निंगमुळे प्रत्येकाला आपल्या घरात बसून आरामात अभ्यास करण्याचा पर्याय मिळतो. मात्र, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. बसण्यासाठी आरामदायी असलेली आणि भरपूर प्रकाश येणारी जागाच ई-लर्निंगसाठी निवडा. यात कोणताच व्यत्यय नको, चार्जिंग पॉइंटच्या जवळ बसा. त्याचप्रमाणे डिहायड्रेशन टाळण्यासाठी पाण्याची बाटली कायम जवळ ठेवा.
३. व्यवस्थित संवाद ठेवणे
ई-लर्निंग वर्गातील अध्ययनाहून बरेच वेगळे असते. विद्यार्थ्यांना एखादा मुद्दा समजला नाही, तर ते शिकवणे सुरू असतानाच मोकळेपणाने शंका विचारू शकतात. ई-लर्निंगमध्ये असे होत नाही. विद्यार्थ्यांकडे शंका विचारण्याचा पर्याय असूनही ते शंका विचारण्यास डगमगू शकतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संवादातील अंतर भरून काढण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या शंका टिपून ठेवू शकतात आणि सत्राच्या अखेरीस ते परस्परांना विचारू शकतात.
४. व्यत्यय टाळणे
ऑनलाइन अध्ययन सत्रांदरम्यान विद्यार्थ्यांनी व्यत्यय टाळला पाहिजे. पूर्वनिश्चित नियम व अटींचे पालन त्यांनी केले पाहिजे. अनावश्यक हस्तक्षेपामुळे चिडचिडल्यासारखे होते आणि त्यात अतिरिक्त वेळ जातो. अधिक अवधान देता यावे तसेच लक्ष केंद्रित करता यावे म्हणून आजूबाजूचा आवाज कमी करा.
५. नियमित ब्रेक्स घेणे
डोळ्यावर येणारा ताण टाळण्यासाठी आणि लक्ष विचलित होऊ नये म्हणून ठराविक वेळाने ब्रेक्स घेत राहा. यामुळे पाठदुखीची समस्याही कमी होते आणि कंटाळल्यासारखेही वाटत नाही.
हे करू नका
१. वर्ग बुडवणे
अनेक विद्यार्थी ऑनलाइन अध्ययन सत्रे बुडवतात. अन्य जबाबदाऱ्या किंवा क्षुल्लक कारणांसाठी व्याख्यानांना विलंबाने पोहोचणे किंवा ती बुडवणे हे करू नका.
२. जड जेवणे
ई-लर्निंग सुरू करण्यापूर्वी जड जेवण किंवा खाद्यपदार्थ घेणे टाळा. कारण, यामुळे सुस्ती येते व कंटाळल्यासारखे वाटू शकते.
३. लक्ष विचलित करणे
या सत्रादरम्यान लक्ष केंद्रित राहील असा प्रयत्न करा. ऑनलाइन अध्ययन काहीसे व्यग्र होऊ शकते आणि त्यामुळे लक्ष विचलित होण्याची शक्यता वाढते.
४. शंका विचारण्यास विसरणे
प्रत्येक सत्राच्या अखेरीस शंका विचारायला विसरू नका. शंकांचे निरसन वेळेत करून घ्या.
लेखन रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्सचे सीईओ आहेत.