WhatsApp युजर्ससाठी अनेक शानदार ट्रिक्स उपलब्ध आहेत ज्यामुळे तुम्ही चॅटिंगचा अनुभव आणखी मजेदार आणि भन्नाट बनवू शकता. येथे अशाच काही ट्रिक्सबद्दल जाणून घेऊया...
मेसेज बोल्ड, इटॅलिक किंवा स्ट्राइकथ्रू करा
तुमच्या मित्रांना प्रभावी मेसेज पाठवण्यासाठी, तुम्ही WhatsApp मध्ये टेक्स्ट बोल्ड, इटॅलिक किंवा स्ट्राइकथ्रू करू शकता.
- टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी, टेक्स्टला * (स्टार) करा.- टेक्स्ट इटॅलिक करण्यासाठी , _ (अंडरस्कोर) चा वापर करा. - स्ट्राइकथ्रूसाठी, ~ (टिल्ड) वापरा.
लास्ट सीन आणि प्रोफाईल फोटो हाईड करणं
तुम्हाला तुमची प्रायव्हसी वाढवायची असल्यास, तुम्ही तुमचा लास्ट सीन, प्रोफाईल फोटो आणि स्टेटस फक्त निवडक लोकांसोबत शेअर करू शकता. यासाठी तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन ‘प्रायव्हसी’ पर्याय बदलू शकता. याद्वारे तुम्ही तुमची माहिती कोण पाहू शकते आणि कोण पाहू शकत नाही हे निवडू शकता.
नंबर सेव्ह न करता एखाद्याला पाठवा मेसेज
अनेक वेळा आपल्याला कोणालातरी व्हॉट्सॲप मेसेज पाठवायचा असतो, पण नंबर सेव्ह करायचा नसतो. यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता: तुमच्या ब्राउझरमध्ये टाइप करा: https://wa.me/91xxxxxxxx (91 नंतर व्यक्तीचा नंबर टाका). थेट चॅट ओपन होईल आणि तुम्ही मेसेज पाठवू शकता.
स्टार मेसेजने सेव्ह करा खास मेसेज
तुम्हाला एखादा खास किंवा महत्त्वाचा मेसेज शोधण्यात समस्या येत असल्यास, तुम्ही तो मेसेज स्टार करून ठेवू शकता. मेसेजला "स्टार" करण्यासाठी मेसेजवर टॅप करा. नंतर तुम्ही “स्टार मेसेज” पर्यायावर क्लिक करा, म्हणजे नंतर पटकन तो मेसेज शोधू शकता.
ऑटोमेटीक रिप्लाय करा सेट
तुम्ही नेहमी WhatsApp वापरू शकत नसल्यास, तुम्ही "ऑटो रिप्लाय" वापरू शकता. हे फीचर प्रामुख्याने व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये उपलब्ध असले तरी तुम्ही थर्ड-पार्टी ॲप्सचीही मदत घेऊ शकता. याच्या मदतीने महत्त्वाच्या मेसेजचे रिप्लाय आपोआप पाठवले जाऊ शकतात.