शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

Online फसवणुकीला बसणार आळा; सरकार आणतंय नवीन नियम, आता सर्वांचे फोन नंबर होणार…

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:02 PM

TRAI New Rule : सरकार मोबाईल कॉलिंगमध्ये मोठे बदल करणार आहे.

नवी दिल्ली :  ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. मोबाईल कॉलिंगमुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. फसवणूक करणारे कॉलिंगद्वारे लोकांची फसवणूक करत आहेत. अशा बनावट नंबरवरून कॉल केला जातो की, तो ओळखणे खूप कठीण जाते. मात्र याला आळा घालण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. 

सरकार मोबाईल कॉलिंगमध्ये मोठे बदल करणार आहे. यामुळे ऑनलाइन फसवणुकीला आळा बसेल आणि बनावट नंबर सुद्धा गायब होतील. सरकार आता ट्रायसोबत (TRAI) एक नवीन प्रणाली तयार करणार आहे. कॉल करणाऱ्यांचा मोबाईल नंबरसह त्याचा फोटोही दिसेल. यासाठी सरकार केवायसी (KYC) प्रणाली लागू करणार आहे. यासाठी दोन व्यवस्था लागू राहतील. पहिले आधार कार्ड आधारित आणि दुसरे सिम कार्ड आधारित.

आधार कार्ड आधारितनवीन प्रणालीनुसार सर्व क्रमांक आधार कार्डशी लिंक केले जातील. अंमलबजावणीनंतर, एखाद्या व्यक्तीने कॉल करताच, मोबाईल क्रमांकासह नाव देखील दिसून येईल. आधार कार्डमध्ये जे नाव असेल तेच नाव दिसेल. दरम्यान, Truecaller अॅपमध्ये काही गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. या अॅपमध्ये युजर्सने स्वतः टाकलेल केलेले नाव दर्शविले आहे. पण, सरकारच्या या नवीन प्रणालीमध्ये तेच नाव दिसेल, जे आधार कार्डवर असणार आहे.

सिम कार्ड आधारितनवीन सिम घेताना तुम्हाला कागदपत्रे द्यावी लागतील, त्या आधारे कॉलिंगसोबत लोकांचे फोटो अटॅच केले जातील. अशा परिस्थितीत बनावट कॉलिंग ओळखणे सोपे होईल. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, कॉल करताना तो फोटो दिसून येईल. जो तुम्ही सिम खरेदी करताना काढला होता.

काय होईल फायदा?ही प्रणाली कार्यान्वित होताच कॉल रिसिव्हरला कळेल की त्यांना कोण कॉल करत आहे. कॉल करणारा व्यक्ती आपली वैयक्तिक माहिती लपवू शकणार नाही आणि फसवणूकीला आळा बसू शकतो.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान