शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

एक चूक अन् तुमचे सिम कार्ड होणार ब्लॉक; TRAI ने आणला नवीन नियम, जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 9:51 PM

टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने फेक/फसवणुकीचे कॉल्स आणि एसएमएस थांबवण्यासाठी नवीन नियम आणले आहेत.

TRAI New Rule : टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने (Telecom Regulatory Authority of India) फेक कॉल्स आणि एसएमएस थांबवण्यासाठी एक योजना आखली आहे. ट्राय कमर्शियल  कॉल्सबाबत नवीन नियम आणणार आहे, ज्यामध्ये चुका करणाऱ्यांचे थेट सिम ब्लॉक करण्याची तरतूद आहे. ट्रायने यासंबंधित 113 पानांचे पत्र जारी केले आहे, ज्यामध्ये व्यावसायिक, अर्थात मार्केटिंग कॉल्स आणि मेसेजबाबतच्या नवीन नियमांची माहिती दिली आहे. याव्यतिरिक्त, रेग्युलेटरने गेल्या दोन वर्षांतील ब्लॉक केलेल्या सिम कार्डचा डेटाही जारी केला आहे.

टेलिकॉम रेग्युलेटरने कंसल्टेशन पेपरमध्ये रजिस्टर्ड आणि अनरजिस्टर्ड टेलीमार्केटरसाठी नवीन नियम दिले आहेत, ज्याचे उल्लंघन केल्यावर दंडात्कम कारवाई किंवा सिम कार्ड ब्लॉक करण्यापर्यंतच्या तरतुदी आहेत. ट्रायच्या नव्या नियमानुसार, कोणत्याही सिमकार्डवरुन दररोज 50 हून अधिक आउटगोइंग व्हॉईस कॉल्स आणि मेसेज केल्यास त्याची चौकशी केली जाईल. तपासादरम्यान नियमांचा गैरवापर आढळल्यास सिमकार्ड ब्लॉक करण्यात येईल.

वापराची मर्यादा लागू केली जाईलआर्थिक फसवणूक रोखण्यासाठी ट्रायने मोठे पाऊल उचलले आहे. एका सिमकार्डवरुन अधिक कॉल आणि मेसेज आल्यास त्याची चौकशी केली जाईल. दूरसंचार नियामकाने अनोंदणीकृत टेलिमार्केटरसाठी वापराची मर्यादादेखील दिली आहे. यानुसार कोणत्याही मोबाइल नंबरवरुन (नोंदणीकृत टेलिमार्केटर) एका दिवसात जास्तीत जास्त 20 आउटगोइंग कॉल आणि 20 आउटगोइंग मेसेज केले जाऊ शकतात.

सिम कार्ड ब्लॉक केले जाईलपहिल्यांदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ताकीद दिली जाईल. नियमाचे दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास, वापराची मर्यादा 6 महिन्यांसाठी लागू केली जाईल. तर, नियमांचे तीन किंवा त्याहून अधिक वेळा उल्लंघन झाल्यास, दोन वर्षांपर्यंत सिम कार्ड ब्लॉक केले जाईल. तसेच, युजरला ब्लॅक लिस्ट केले जाईल.

किती सिम ब्लॉक केले?2022 आणि 2023 या आर्थिक वर्षात 59 हजारांहून अधिक सिमकार्ड ब्लॉक करण्यात आल्याचे ट्रायने आपल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये म्हटले आहे. 2022 मध्ये एकूण 32,032 सिम कार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत आणि 2023 मध्ये एकूण 27,043 सिम कार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत. नियामकाने 25 सप्टेंबर 2024 पर्यंत त्यांच्या नवीन कंसल्टेशेन पेपरबाबत भागधारकांचे मत मागवले आहे.

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायtechnologyतंत्रज्ञान