मोबाईल फोन युझर्सना आता एक मोठा दिलासा असणार मिळणार आहे. याचं कारण DND म्हणजेच डू-नॉट-डिस्टर्ब अॅप सेवा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI द्वारे मार्च २०२४ पासून भारतात सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा सर्व अँड्रॉइड स्मार्टफोन युझर्ससाठी उपलब्ध असेल. डीएनडी अॅप सेवा सुरू करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती, पण अखेर ती अँड्रॉइड यूजर्ससाठी सुरू करण्यात येत आहे.कोणाला मिळेल फायदा?डीएनडी ही सेवा प्रथम अँड्रॉईड युझर्ससाठी उपलब्ध होईल. परंतु iOS युझर्सना सध्या डीएनडी सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. कारण अॅपलनं अॅपवर कॉल लॉगचा अॅक्सेस देण्यास नकार दिलाय. परंतु लवकरच आयओएस डिव्हाईसेससाठीही ही सेवा सुरू केली जाणार असल्याचं सचिव व्ही रघुनंदन यांचं म्हणणं आहे.काय होणार फायदा?डीएनडी अॅप सेवा सुरू झाल्यानंतर तुम्हाला अनावश्यक मेसेज आणि कॉल्सपासून सुटका होईल. सध्या फेक कॉल आणि मेसेज ही मोठी समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत ट्रायकडून नवीन अॅप बेस्ड उपाय आणला जात आहे. ट्राय पायलट प्रोजेक्ट अंतर्गत डीएनडी सेवा चालवत आहे, जेणेकरून अॅपमधील त्रुटी वेळेत सुधारता येतील. यानंतर, हे अॅप मार्चमध्ये सर्व युझर्ससाठी उपलब्ध केलं जाणार आहे.डीएनडी अॅपला तुमच्या मोबाइल फोनच्या कॉल लॉगचा अॅक्सेस असायला हवा. याद्वारे तुम्हाला येणारा कोणता कॉल आणि मेसेज फेक आहे हे समजेल.
आता सुरू होणार TRAI ची नवी DND App सर्व्हिस, मोबाइल युझर्सची चांदी; पाहा याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 3:40 PM