नवी दिल्ली - मोबाईलवर येणाऱ्या Spam Calls मुळे प्रत्येक जण त्रस्त असतो. तुम्ही कुठलाही फिचर वापरला तरी Unknown आणि Spam Calls पासून वाचणं कठीण आहे. कर्ज, विविध ऑफर्ससाठी मोबाईल ग्राहकांना कॉल्स येत असतात. आता या कचाट्यातून युजर्सला बाहेर काढण्यासाठी TRAI नं नवीन फिचरवर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नको असलेल्या कॉल्सपासून तुमची सुटका होण्याची शक्यता आहे.
काय आहे नवीन फिचर? भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) चे नवीन फिचर कॉलर आयडेंटिशी निगडीत आहे. रिपोर्टनुसार, लवकरच तुम्हाला येणाऱ्या कॉलसोबतच कोणत्या व्यक्तीने तुम्हाला कॉल केलाय त्याचं नावही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. हे नाव युजरच्या केवायसीनुसार असेल. म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर सिम असेल त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला दिसेल. हा नियम लागू होताच, वापरकर्त्यांना त्या कॉलरचे नाव देखील दिसेल, ज्याचा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह नसेल. ट्राय पुढील तीन आठवड्यात हे फीचर लॉन्च करू शकते.
Truecaller चं अस्तित्व धोक्यात?सध्या अशा फीचर्ससाठी यूजर्सला Truecaller सारख्या थर्ड पार्टी अॅप्सची गरज आहे. पण या अॅप्सचा सर्वात मोठा मायनस पॉइंट म्हणजे त्यांचा डेटाबेस. Truecaller सारख्या अॅप्सचा सर्व डेटा क्राउडसोर्स केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर १००% विश्वास ठेवता येत नाही. तुम्हाला KYC आधारित प्रणालीवर पूर्ण विश्वास ठेवता येईल. लोकांच्या मनात असाही प्रश्न येतो की, ही सेवा सुरू झाल्यानंतर Truecaller सारखे अॅप्स संपतील. ट्रायच्या या आगामी सेवेची चर्चा सुरू झाली तेव्हा Truecaller ने या सेवेशी स्पर्धा करणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितले होते. WhatsApp ला जोडणार नवीन फिचर?अशाच आणखी एका सेवेवर काम सुरू आहे, ज्याद्वारे युजर्सला व्हॉट्सअॅपवर कॉलरचं नाव पाहायला मिळेल. व्हॉट्सअॅपवर अनेक लोक फसवणुकीच्या कॉलला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत ट्राय अशा फीचरवर काम करत आहे, जेणेकरून ग्राहकांना त्यांना कोण कॉल करतंय याची माहिती कळेल मात्र, व्हॉट्सअॅपवर ही सेवा कशी असेल याबाबत फारशी माहिती नाही. एकूणच, ही सेवा सुरू केल्यानंतर, युजर्सना एक चांगला कॉलिंग अनुभव मिळेल हे नक्की
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"