शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

लय भारी! अवघ्या १ रुपयात विमानाचं तिकीट बूक करा, कसं ते जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 8:41 AM

भारतात रेल्वे तिकीट बुक करणं अवघड काम आहे असं म्हटलं जातं. रेल्वे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना खूप प्रयत्न करावे लागतात.

भारतात रेल्वे तिकीट बुक करणं अवघड काम आहे असं म्हटलं जातं. रेल्वे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना खूप प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर कुठं जाऊन कन्फर्म तिकीट मिळतं. अनेकदा तर प्रवाशांना वेटिंगवरच राहावं लागतं. तर काहींना कन्फर्म तिकीट मिळूनही जागा मिळत नसल्यानं शेवटच्या क्षणाला त्रासाला सामोरं जावं लागतंच. हा सगळा व्याप लक्षात घेता तिकीट बुकिंग अ‍ॅप ट्रेनमॅनने एक नवीन फीचर आणलं आहे. यामध्ये प्रवाशांना रेल्वेच्या कन्फर्म तिकिटाची हमी दिली जात आहे. महत्वाची बाब अशी की जर तुमचं ट्रेनचं तिकीट कन्फर्म झालं नाही तर कंपनी तुम्हाला प्रवास करण्यासाठी थेट विमानाचं तिकीट देईल.

कसं काम करतं हे फिचर?ट्रेनमॅन अ‍ॅपने ट्रिप अ‍ॅश्युरन्स नावाचं नवीन फीचर लाँच केलं आहे. या नवीन फीचरच्या मदतीनं वेटिंग लिस्टमध्ये असलेले रेल्वे प्रवासी आपला प्रवास पूर्ण करू शकतील. या अ‍ॅपद्वारे कोणीही रेल्वे तिकीट बुक करतो तो अ‍ॅपमध्येच त्याच्या तिकिटाची सद्यस्थिती पाहू शकतो. प्रवाशाला कन्फर्म तिकीट न मिळाल्यास तिकीट कन्फर्म मिळण्याची शक्यता कितपत आहे याची माहिती अ‍ॅप देईल. चार्ट तयार करण्यापूर्वी तुमचे तिकीट कन्फर्म न झाल्यास, ट्रिप अ‍ॅश्युरन्स फीचरच्या मदतीनं प्रवासी शेवटच्या क्षणी हवाई तिकीट बुक करू शकतात.

अ‍ॅपमध्ये प्रवाशाचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता ९० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं दाखवत असेल तर अ‍ॅप १ रुपये ट्रीप अ‍ॅश्युरन्स शुल्क आकारेल. जर ९० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर कंपनी तिकीटाच्या वर्गानुसार नाममात्र शुल्क आकारेल. यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे चार्ट तयार करताना ट्रेनचं तिकीट कन्फर्म झाल्यास ट्रिप अ‍ॅश्युरन्स फी परत केली जाईल. मात्र, तिकीट कन्फर्म न झाल्यास, प्रवाशाला प्रवास पूर्ण करण्यासाठी मोफत विमान तिकीट देईल.

या रेल्वे गाड्यांसाठी सुविधा उपलब्ध होणारहे देखील लक्षात घेण्यासारखं आहे की ट्रिप अ‍ॅश्युरन्सचे हे वैशिष्ट्य सध्या सर्व IRCTC राजधानी ट्रेन आणि सुमारे १३० इतर ट्रेनसाठी उपलब्ध आहे. कंपनीच्या मते, ट्रेनमॅन अ‍ॅप मशीन लर्निंग सारख्या नवीन युगातील तंत्रज्ञानाचा वापर करतं आणि ते IRCTC चे अधिकृत भागीदार आहे. प्रवाशांना त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ट्रिप अ‍ॅश्युरन्सचं फिचर सुरू करण्यात आलं आहे.

रिपोर्ट्सनुसार, कंपनीचा दावा आहे की वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता वर्तवण्यात ९० टक्के अचूक आहे. पण, तिकीट कन्फर्म न झाल्यास कंपनी त्या व्यक्तीला मोफत विमान तिकीट देईल. पण ट्रिप अ‍ॅश्युरन्सची ही सुविधा ज्या शहरांमध्ये विमानतळ आहेत त्यांनाच लागू असेल.

(टीप: १ रुपयाच्या फ्लाइट तिकिटांची ही माहिती मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे देण्यात आली आहे. या अ‍ॅपद्वारे बुकिंग करण्यापूर्वी, स्वतः तपशील तपासा आणि स्वतःच्या जबाबदारीवर बुक करा.)

टॅग्स :technologyतंत्रज्ञान