नवी दिल्ली- स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगच्या सेवेमुळे बाजारात दबदबा निर्माण केलेल्या जिओनं आणखी एक जबरदस्त प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. जिओनं प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर 98 रुपयांत 28 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. या नव्या टेरिफ प्लॅनचा तुम्हाला 26 जानेवारी 2018पासून फायदा मिळणार आहे.जिओच्या या जबरदस्त प्लॅनअंतर्गत तुम्हाला 28 दिवसांसाठी फ्री कॉलिंगसह अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. जिओनं दावा केला आहे की, इतर कंपन्यांच्या तुलनेत आमचा प्लॅन 50 रुपयांनी स्वस्त आहे. तसेच त्याच किमतीत आम्ही 50 टक्के अधिक डेटाही देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला प्रतिदिन मिळणा-या सर्व 1 जीबी डेटा पॅकवर आता 1.5 जीबी डेटा मिळणार आहे.तसेच 1.5 जीबी डेटा असलेल्या पॅकवरही प्रतिदिन 2 जीबी डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता 399 रुपयांच्या प्लॅनमध्येही 84 दिवसांसाठी फ्री वॉइस कॉल, अनलिमिटेड (प्रतिदिन 1.5 जीबी) डेटा, मोफत एसएमएस आणि जिओ अॅपचं प्रीमियम सबक्रिप्शन मिळणार आहे.
जिओपेक्षा एअरटेलने आणला स्वस्त प्लॅनजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने जिओपेक्षा स्वस्त डेटा प्लॅन लाँच केला होता. या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 3.5 जीबी इंटरनेट डेटा मिळणार होता. तसंच लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार होती. या प्लॅनची मर्यादा 28 दिवसांची आहे. एअरटेलने लाँच केलेल्या प्लॅनमध्ये युजर्सला 98 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची किंमत 799 रूपये असून एअरटेलच्या प्रीपडे यूजर्सना हा प्लॅन घेता येईल.
रिलायन्स जिओच्या 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड इंटरनेटची सुविधा मिळते आहे. याशिवाय लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. पण या प्लॅनमध्ये अनलिमिटेड इंटरनेटसह एक अट घालण्यात आली आहे. युजरला दररोज 3 जीबी डेटा वापरायला मिळेल. 28 दिवसांसाठी हा प्लॅन लागून असून, त्यामध्ये 84 जीबी डेटा मिळणार आहे. जिओ व एअरटेलच्या या डेटा प्लॅनची तुलना केल्यास एअरटेलकडून युजर्सना जास्त इंटरनेटची सुविधा दिली जाते आहे.