शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

स्मार्टफोन घ्यायचाय?; ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह १० हजारांपर्यंतचे हे असू शकतात 'बेस्ट' ऑप्शन

By जयदीप दाभोळकर | Published: January 22, 2021 12:55 PM

पाहा कोणते आहेत हे फोन आणि किती मिळू शकतं डिस्काऊंट

ठळक मुद्देपाहा कोणते आहेत हे स्मार्टफोन्सअनेक स्मार्टफोन्सवर मिळणार मोठा डिस्काऊंट

आजकाल आपण स्मार्टफोन खरेदी करताना सर्वच बाजूंचा विचार करत असतो. मग त्यात फोनची बॅटरी असते, डिस्प्ले, तो फोन 4G आहे 5G नाहीतर त्याचा कॅमेरा आणि गेमिंग परफॉर्मन्स. अनेकाना फोटोग्राफीची आवड असते. अशातच अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना त्यांचा कल हा त्याच्या कॅमेऱ्यावर असतो. अधिक मेगापिक्सेल असलेल्या कॅमेऱ्यांकडेही अनेकांचा कल दिसून येतो.आज आपण १० हजार रूपयांपर्यंतचे फोन पाहणार आहोत. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह अनेक फीचर्स देण्यात आलेले आहेत. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर सुरू असलेल्या सेलमध्ये कोणती ऑफर मिळत आहे हेदेखील आपण पाहणार आहोत. 

Realme Narzo 20A

या स्मार्टफोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत ८,४९९ रूपये आहे. परंतु या स्मार्टफोनची खरी किंमत १०,९९९ रूपये इतकी आहे. २,५०० रूपयांच्या डिस्काऊंटसह हा फोन खरेदी करता येऊ सकतो. यासोबतच ग्राहकांना ७,९५० रूपयांची एक्सचेंज ऑफरही देण्यात येत आहे. सध्या ही ऑफर फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेराही देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेन्सर १२ मेगापिक्सेल, दुसरा आणि तिसरा कॅमेरा सेन्सर २ मेगापिक्सेलचा आहे. तर यामध्ये ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

Poco C3

हा फोनदेखील ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी व्हेरिअंटसह येतो. याची किंमत ९,९९९ रूपये इतकी आहे. तसंच या स्मार्टफोनवर ३ हजार रूपयांचा फ्लॅट डिस्काऊंटही देण्यात येत आहे. त्यामुळे हा फोन ६,९९९ रूपयांत खरेदी करता येऊ शकतो. यासोबत ६,४९० रूपयांची एक्सचेंज ऑफरही देण्यात येत आहे. सध्या हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच यामध्ये दुसरा आणि तिसरा कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे. 

Realme C12

या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आलं असून या व्हेरिअंटची किंमत ८,४९९ रूपये इतकी आहे. या स्मार्टफोनची खरी किंमत १०,९९९ रूपये इतकी आहे. २,५०० रूपयांच्या डिस्काऊंटसह हा स्मार्टफोन खरेदी करता येऊ शळकतो. सध्या फ्लिपकार्टवर हा फोन उपलब्ध असून या स्मार्टफोनमध्येही ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा असून २ मेगापिक्सेलचे अन्य दोन कॅमेरे आहेत. तसंच सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सेलचा कॅमेराही देण्यात आला आहे. 

OPPO A15

हा स्मार्टफोन अॅमेझॉनवर उपलब्ध असून हा ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह येतो. याची किंमत १२,९९० रूपये इतकी आहे. परंतु हा फोन ३ हजार रूपयांच्या डिस्काऊंटसह ९,९९० रूपयांना विकत घेता येऊ शकतो. तसंच यासोबत ९,४०० रूपयांची एक्सचेंज ऑफरही मिळते. यामध्येदेखील ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा असून अन्य दोन कॅमेरे हे २ मेगापिक्सेलचे आहेत. 

Samsung Galaxy M02s 

हा फोनदेखील तुम्हाला अॅमेझॉनवरून खरेदी करता येऊ शकतो. यामध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनची किंमत १०,४९९ रूपये इतकी असून यावर १,८०० रूपयांचा डिस्काऊंटही देण्यात येत आहे. हा फोनसह ८,२५० रूपयांची एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. या स्मार्टफोनमध्येदेखील ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं असून यातील मुख्य कॅमेरा हा १३ मेगापिक्सेलचा आहे आणि अन्य दोन कॅमेरे हे २ मेगापिक्सेलचे आहेत. तर या फोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Mobileमोबाइलamazonअ‍ॅमेझॉनFlipkartफ्लिपकार्टsaleविक्रीonlineऑनलाइनInternetइंटरनेट