नवी दिल्ली - मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. ट्विटरवर फक्त Tweet नाही तर आता Fleet देखील करता येणार आहे. कारण आणखी एक भन्नाट फीचर लवकरच ट्विटर आपल्या युजर्ससाठी आणणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एडिट ट्विट फीचरची मागणी होत होती. सध्या या फीचरची चाचणी सुरू असून हे फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या फीचरसारखे आहे.
ट्विटरवर युजर्सना आतापर्यंत फक्त ट्विट करण्याची सुविधा होती. परंतु, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या स्टोरी आणि स्टेट्सचे फीचर या ठिकाणी नाही. मात्र आता ट्विटरवर Fleet नावाच्या आणखी एका नवीन फीचरची चाचणी करण्यात येत आहे. या नवीन फीचरच्या मदतीने जेव्हा एखाद्या व्यक्तीने ट्विट केलं तर ते एका वेगळ्या टाईमलाईनवर दिसेल. तसेच 24 तासांनंतर हे आपोपाप गायब होईल. व्हॉट्सअॅप आणि फेसबुक स्टेट्स यासारखे हे नवे फीचर असणार आहेत.
ट्विटर ग्रुप प्रोडक्ट मॅनेजर यांनी एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आता युजर्संना दुसऱ्या पद्धतीने चर्चा करण्यासाठी आणि कमी वेळात जास्त कंट्रोल करणारं फीचर देण्यात आले आहे. ट्वीट हे सार्वजनिक असतं. ते सर्वांना कायम दिसतं. त्यामुळे अनेकजण ट्विटरचा वापर जास्त करत नाहीत. सध्या हे फीचर ब्राझीलमध्ये सुरू करण्यात येत आहे.' ट्विटरने या नव्या फीचरला Fleet असं नाव दिलं आहे. त्यामुळे युजर्स आता ट्विट सोबतच Fleet देखील करू शकतात.
ट्विटरवर युजर्सना Fleet करता यावं यासाठी एक नवं बटण देण्यात आलं आहे. ज्यावर क्लिक करून Fleet करता येतं. Fleet अंतर्गत युजर्संना 280 टेक्स्ट कॅरेक्टर अॅड करता येईल. यात फोटो किंवा जीफ फाइल आणि व्हिडिओ सुद्धा पोस्ट करता येईल. ज्या अकाउंट्सला फॉलो केले आहे. त्यांचे फ्लिट वरच्या बाजुच्या टॅबमध्ये दिसेल. कोणत्याही फ्लिटला रिट्विट करता येऊ शकणार नाही. इमोजीसाठी फ्लिटला रिस्पॉन्ड करू शकता येईल. लवकरच हे फीचर जगभरात लाँच करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
'या' बातम्या ही नक्की वाचा
प्रतिक्षा संपली! WhatsApp चं डार्क मोड फीचर लाँच, असं करा अॅक्टिव्ह
लय भारी! सिंगल कॅमेरा फोनवरून Facebook वर अपलोड करता येणार 3D फोटो
Google Chrome चा वापर करता?, मग त्वरित करा 'हे' काम, अन्यथा...
TikTok ने आणलं दमदार फीचर, मुलांच्या करामतींवर आता पालकांची नजर
'Meena' मारणार युजर्सशी मनसोक्त गप्पा, गुगलने आणली भन्नाट 'चॅटबोट'
महत्त्वाच्या बातम्या
China Coronavirus : 'सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची कोरोना तपासणी करा'
८0 देशांत कोरोना; भारतात ३0 रुग्ण; अनेक कार्यक्रम रद्द
एकही मंत्री कामाचा नाही, हे तर भ्रष्ट सरकार; काँग्रेस आमदाराचा राजीनामा
महाविकास आघाडी सरकारच्या विविध मंत्र्यांनी १०० दिवसांत घेतलेले महत्त्वाचे निर्णय
राज्याचा विकासदर घटला, बेरोेजगारीत दीड लाखांची वाढ