Twitter Blue Tick: Tesla, SpaceX आणि आता Twitterचे मालक Elon Musk यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. सर्वप्रथम त्यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले. यानंतर सर्वात मोठा निर्णय म्हणजे ब्लूटीकसाठी पैसे घेणे. सर्वांसाठीच हा निर्णय धक्कादायक आहे. या निर्णयावर अनेकजण नाराज आहेत. भारतातील ‘पहिली’ ट्विटर यूजर नयना रेडू हिनेही याबाबत आपले म्हणणे मांडले आहे.
इलॉन मस्कच्या निर्णयांवर नैनाचे मत
इलॉन मस्क यांनी ट्विटरवर दिलेल्या ब्लू टिकसाठी $8 म्हणजेच सुमारे 650 रुपये महिना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना नैना रेडू यांनी आपले स्पष्ट मत मांडले. नैना एक अॅक्टिव्ह ट्विटर यूजर असून, तिच्या प्रोफाइलवर ब्लूटिक देखील आहे. या ब्लूटिकबाबत नैना म्हणाली, "ब्लूटिकसाठी किती शुल्क आकारले जाणार, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. ब्लू टिकचा अर्थ आता आहे तसाच राहील की बदलेल, हा निर्णय झाल्यावरच मी काही ठोस निर्णय घेऊ शकेल."
पैसे देणार नाहीनैना यावेळी स्पष्टपणे म्हणाली की, तिने गेल्या 16 वर्षात यासाठी पैसे दिले नाहीत, मग आता का द्यायचे. याचा भारतावर काय परिणाम होईल, यावरही ती बोलली. नैना म्हणाली की, सर्वसाधारणपणे ब्लू टिक असण्याची गरज नसल्यामुळे त्याचा काही परिणाम होईल असे तिला वाटत नाही. शिवाय ज्यांना त्याची गरज आहे आणि ज्यांना परवडेल, ते विकत घेतील आणि सर्वसामान्यांनाही त्याचा फटका बसणार नाही. मात्र, स्वतंत्रपणे पत्रकारिता करणाऱ्या आणि परवडत नसलेल्यांवर नक्कीच परिणाम होईल.
कोण आहे नैना रेडू?नैना रेडूने 16 वर्षांपूर्वी पहिल्यांदा ट्विटरवर अकाउंट उघडले होते. ती भारतातील सर्वात पहिली ट्विटर यूजर असून, आज इंटरनेटच्या मदतीने लाखो रुपये कमवतात. नैना गेस्ट एस्पीरियन्स मॅनेजिंग म्हणूनही काम करते. तसेच ती फोटोग्राफर आणि ब्लॉगर देखील आहे. तिचे वडील लष्करात असताना ती देशाच्या विविध भागात राहिली आहे. TWTTR असे स्पेलिंग असताना नैनाने ट्विटरवर खाते तयार केले होते. 13 जुलै 2006 ला ट्विटर लाँच होताच ती जॉईन झाली होती.