Twitter वर पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही प्रोसेस बंद होती. आता पुन्हा ही व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू झाल्यामुळे आणखी काही अकाऊंट्सना ब्लू टिकमार्क मिळू शकणार आहे. कंपनी आता यासाठी सेल्फ सर्व्ह अॅप्लिकेशन लाँच करण्यार असून त्याद्वारे युझर्सना व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय करता येईल. १६ नोव्हेंबर २०१७ पासून ट्विटरनं ही सेवा बंद केली होती. ब्लू टिककडे एकादा शेरा असल्याप्रमाणे पाहिलं जात होतं आणि त्यामुळे त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला होता. आता तीन वर्षांनी पुन्हा ट्विटर नव्या व्हेरिफिकेशन सिस्टम सहित परतलं आहे. यासाठी कसं अप्लाय करता येईल हे आता पाहू.ट्विटरनुसार कोणताही अकाऊंट व्हेरिफाय होण्यासाठी नोटेबल आणि अॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. असे सहा प्रकारचे अकाऊंट आहेत जे नोटेबल आहेत. यामध्ये सरकारी, कंपनी-ब्रॅड अथवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, एन्टरटेन्मेंट, स्पोर्ट्स आणि ईस्पोर्ट्स, अक्टिव्हिस्ट तसंच ऑर्गनायझर्स आणि इन्फ्ल्युएन्सर्स चा समावेश होतो. ट्विटरच्या म्हणण्यानुसार त्यांना यात अन्य पर्याय उपलब्ध करून देण्याच्याही सूचना मिळाल्या आहेत. यात अॅकॅडमिक्स, दुसऱ्या धार्मिक लीडर्सचाही समावेश आहे.कंपनीनं दिलेल्या माहितीप्रमाणे ते लवकरत एक सेल्फ सर्व्ह पोर्टल रिलाँच करणार आहे. यामुळे लोकं व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय करू शकतात. यासाठी युझर्सना व्हेरिफाईड स्टेटससाठी एक कॅटेगरी सिलेक्ट करावी लागेल. तसंच आपल्या आयडेंटिटी लिंक्स आणि दुसरे सपोर्टिंग मटेरिअल्ससोबत कन्फर्म करावं लागेल. परंतु जर तुमच्या अकाऊंटचं नाव बदललं किंवा तो अकाऊंट इनअॅक्टिव्ह राहिला तर तर त्यावरील ब्लू टिक काढलीही जाऊ शकते.
Twitter वर पुन्हा सुरू होणार 'ब्लू टिक' व्हेरिफाईंग प्रोसेस; पाहा तुम्हाला कसं करता येईल अकाऊंड वेरिफाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:45 PM
पाहा कसं करू शकता अप्लाय
ठळक मुद्देतीन वर्षांपूर्वी ट्विटरनं बंद केली होती सेवाट्विटर सेल्फ सर्व्ह पोर्टल रिलाँच करणार