मुंबई - मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने ट्विटमधील अक्षरसंख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ट्विट करताना 140 कॅरेक्टर लिमिट आहे ते आता लवकरच 280 होणार आहे. ट्विटरनेच ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
यासाठीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी केलेल्या ट्विटमध्ये 'तुमचे टि्वट 140 कॅरॅक्टरमध्ये बसत नाहीत का? आम्ही काहीतरी नवं करण्याचा प्रय़त्न करत आहोत ही मर्यादा आता 280 होणार आहे.'
चाचणीदरम्यान काही निवडक युझर्सना ही सेवा मिळेल. त्यानंतर सर्वांसाठी ही सेवा सुरू होईल. याबाबत ट्विटरने एक ब्लॉग लिहिला आहे. जपानी, कोरियाई किंवा चीनी भाषेत एका कॅरेक्टरमध्ये दुप्पट माहिती देता येते पण इंग्रजी भाषेत हे शक्य नाही. अनेक जणांना 140 कॅरेक्टरमध्ये व्यक्त होता येत नसल्याने ते लोकं ट्विटच करत नाहीत. कॅरेक्टर लिमिट वाढल्याने ट्विट न करणारे लोकंही ट्विट करतील असा विश्वास ट्विटरने आपल्या ब्लॉगमध्ये व्यक्त केला आहे.