न्यूयॉर्क : सोशल मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची निळी चिमणी उडून जाणार आहे. कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलणार असल्याचे सांगितले. चिमणीची जागा इंग्रजी अक्षर X असलेला लोगो घेणार असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर, मस्क यांनी संपूर्ण ट्विटर ब्रॅंड बदलण्याचे संकेत दिले आहेत.
मस्क यांनी ग्रेग नावाच्या यूझरसोबत अंतराळावर चर्च करताना लोगो बदलण्याचे संकेत दिले. त्यांना जेव्हा विचारले की, तुम्ही खरोखर लोगो बदलणार आहात का?, त्यावेळी त्यांनी ‘होय’, असे उत्तर दिले. यासोबतच त्यांनी ट्विटरवर एक पोल टाकला. डिफॉल्ट रंग काळा ठेवायचा की पांढरा?, याबाबत हा पोल होता. त्यावर काही तासांमध्येच ८.५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी प्रतिसाद दिला. बहुतांश लोकांनी पांढऱ्या रंगाला पसंती दिली आहे.